*कोकण Express*
*देशातील पहिल्या क्रमांकाच्या सातारा जिल्हा बँकेने अभ्यास दौ-यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवड करावी हे हि आमच्या दृष्टीने अभीमानास्पद बाब:मनिष दळवी*
*नाबार्डच्या सुचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रगतशील कामकाज पध्दतीचा अभ्यास करण्यासाठी देशातील पहिल्या क्रमांकाच्या सातारा जिल्हा बँक अघिक-यांच्या पथकाची जिल्हा बँक प्रधान कार्यालयास भेट*
*सातारा जिल्हा बँक अधिका-यांकडून सिंधुदुर्ग जिल्हा बँक कामकाजाचं कौतुक*
*जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी,उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केले अधिका-यांचे स्वागत*
*सिंधुदुर्गनगरी (प्रतिनीधी)*
देशातील पहिल्या क्रमांकाच्या सातारा जिल्हा बँकेने अभ्यास दौ-यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवड करावी हि आमच्या दृष्टीने अभीमानास्पद बाब असल्याचे मत जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी यांनी ओरोस येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात व्यक्त केले* सातारा जिल्हा बँक हि राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिल्या क्रमांकाची बँक असुन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रगतशील कार्यपध्दतीचा अभ्यास करण्याबाबत नाबार्डने सातारा जिल्हा मध्य.सहकारी बँकेस अभ्यास दौरा आयोजीत करावा असे कळविले त्यानुसार सातारा जिल्हा बँकेच्या १३अधिका-यांचे एक पथक सोमवारी ओरोस येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यलयात दाखल झाले.यावेळी जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक महेश सारंग,प्रकाश मोर्ये, जिल्हा बँक मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी सातारा जिल्हा बँकेच्या सर्व अधिकारी पथकाचे स्वागत केले.* सातारा जिल्हा बँक हि राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिल्या क्रमांकाची नामांकीत बँक असुन महाराष्ट्र शासन नाबार्ड राज्य बँक,नँफस्कॉब,राज्यबँक असोसिएशन व इतर नामांकीत संस्थाचे १०१पुरस्कारांनी सातारा जिल्हा बँकेस सन्मानित करण्यात आले आहे. सरव्यवस्थापक-राजीव गाढवे, व्यवस्थापक- यशवंत साळुंखे, उपव्यवस्थापक -प्रशांत देशमुख,प्रोजेक्ट मँनेजर प्रकाश टकले,आय टि विभाग-अजय पाटील, अकौंटंट,गुतवणूक- विनोद ढाणे,राजेंद्र गायकवाड,घनशयाम सावंत,अमोल गुजर, तानाजी जानुगडे, अभयसिंह गायकवाड, चक्रधर पोतदार,रोहीत घोरपडे,बँक ऑडीटर- उदय कुलकर्णी,आदी अधिकारी पथकाने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयास भेट दिली व प्रत्येक विभागाची भेट देउन बँक कामकाजाची माहीती जिल्हा बँकचे अधिकारी कर्मचा-यांकडून घेतली.सातारा जिल्हा बँकेच्या अधिकारी पथकाचा हा ३दिवसांचा अभ्यास दौरा आहे.जिल्हा बँकेच्या काही शाखांना भेटी देउ न हे पथक बँक शांखामधील कामकाजाची माहीती घेणार आहेत.