*कोकण Express*
*युवा सेनेच्या वतीने खारेपाटण येथे राज्यपालांच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहीम*
*युवा सेना महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य अंकित प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या महाराष्ट्र् राज्यबद्दलच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्याकरिता आज युवा सेनेच्या वतीने सर्वत्र स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती. खारेपाटण येथे देखील युवा सेना महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य अंकित प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी करत राज्यपालांचा जाहीर निषेध करण्यात आला.
खारेपाटण एस. टी. बसस्थानक येथे आज सायंकाळी ५.३० वाजता युवा सेनेचे पदाधिकारी एकत्र येत महाराष्ट्र् राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख तथा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक सुशांत नाईक, कणकवली उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर, कणकवली तालुका सहसंपर्क प्रमुख रुपेश सावंत, समन्वयक राजू राठोड, नांदगाव शहर प्रमुख इमान नावलेकर, उपतालुका प्रमुख अबू मेस्त्री, उपतालुका प्रमुख उत्तम लोके, खारेपाटण युवा सेना विभाग प्रमुख संकेत लोकरे, उपतालुका प्रमुख समन्वयक तेजस राऊत, भूषण शेलार, मंदार पवार, सुजय पाटणकर, कुमार कोळसुलकर, प्रजोत मोहिरे, प्रकाश नानिवडेकर, सुनील कर्ले, वैभव कांबळे, संतोष तुरळकर, गिरीश पाटणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र् राज्याचे राज्यपाल यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात युवा सेनेच्या वतीने निषेध करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम विधानसभा मतदार संघात राबविण्यात आली असून सर्वसामान्य जनतेमध्ये देखील राज्यपालांविषयी प्रचंड चीड निर्माण झाली असून आमच्या प्रत्येक शिवसेना कार्यकर्त्यांकडे आपल्या भावना दुखावल्या जात आहेत. यासाठी युवा सेनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर निषेध करण्यात येणार असल्याचे युवा सेनेचे महाराष्ट्र् राज्य कार्यकारणी सदस्य अंकित प्रभू यांनी खारेपाटण येथील आयोजित जाहीर निषेध आंदोलन स्वाक्षरी मोहिमेत बोलताना सांगितले.