समाज ऋणाई’ सन्मान जाहीर

समाज ऋणाई’ सन्मान जाहीर

*कोकण Express*

*समाज ऋणाई’ सन्मान जाहीर*

*विजय चव्हाण, बापू खरात, अजय कांडर, निलेश पवार, प्रा राजेंद्र मुंबरकर,डॉ प्रशांत मडव, राजन चव्हाण, राजेश कदम, सुर्यकांत वारंग, अर्पिता मुंबरकर आदींचा समावेश*

*’साद’ फाउंडेशनच्या शुभारंभ निमित्त उद्या कणकवलीत कार्यक्रम*

*कुडाळ न. प. प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक यांची संकल्पना*

*कणकवली/ प्रतिनिधी*

कुडाळ नगरपंचायतीच्या प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक यांच्या संकल्पनेतून, साद फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. फाउंडेशनचे उद्घघाटन उद्या सोमवार दि. 1 ऑगस्ट रोजी सायं. 6.30 वा. कणकवली विद्यामंदिर समोरील महाराजा सभागृहात करण्यात येत आहे. या निमित्ताने साद फाउंडेशनतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने कार्यरत असणाऱ्या दहा व्यक्तींना समाज ऋणाई सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे.
‘समाज ऋणाई’ सन्मान विजेत्यांमध्ये, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, सुप्रसिद्ध कवी अजय कांडर, तरुण अभिनेते निलेश पवार, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ राजेंद्र मुंबरकर, डॉ प्रशांत मडव, पत्रकार राजन चव्हाण,निवेदक आणि शिक्षक राजेश कदम, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, सामाजिक कार्यकर्त्या अर्पिता मुंबरकर आदींचा समावेश आहे.
समाजातील गरजू आणि शोषित घटकांसाठी विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती कार्यरत असतात. आपण समाजाचे देणे लागतो अशी प्रांजळ भावना त्यामागे असते. हीच भावना ठेवून गितांजली नाईक यांच्या संकल्पनेतून “साद फाउंडेशन” या संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे.श्रीमती नाईक या अपार कष्टातून अधिकार पदापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे सदर संस्थेच्या माध्यमातून समाजातील संघर्ष करणाऱ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना ही योग्य ते मार्गदर्शन आणि मदत या फाउंडेशनच्या माध्यमातून करणार आहे. याच पार्श्वभूमीवर समाजात विविध क्षेत्रात कार्यरत राहणाऱ्या वरील मान्यवरांना समाज ऋणाई सन्मानाने सन्मानित करण्यात येत असून, कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!