रस्त्यावर पडलेला गाळ तातडीने उचला

रस्त्यावर पडलेला गाळ तातडीने उचला

*कोकण Express*

*रस्त्यावर पडलेला गाळ तातडीने उचला…*

*सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव यांची प्रशासनाकडे मागणी…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

तलावातील गाळ काढून चार दिवस उलटूनही उपजिल्हा रुग्णालयासमोर हायवेवर पडलेले गाळाचे ढिगारे जशाच तसे असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. या चार दिवसात दोन अपघात घडले असून, नगरपालिका प्रशासनाने तातडीने हा गाळ उचलण्यात यावा अशी मागणी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी केली आहे.

यावेळी ते पुढे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी एक कार रस्त्याचा अंदाज न आल्याने मातीच्या ढिगाऱ्या मुळे अपघात झाला होता. तर काल रात्री एक मोटारसायकल वाल्याचा अपघात झाला होता. तसेच या मातीच्या ढिगाऱ्याचा सकाळी संध्याकाळी वॉक करणाऱ्या वृध्द व्यक्तींना देखील त्याचा त्रास होत आहे. तसेच या परिस्थितीत पाऊस पडल्यास त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य होऊन जनजीवन विस्कळित होऊन मनुष्य किंवा आर्थिक हानी देखील होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!