दिव्यांगांना रेशनदुकानावरील अंत्योदय योजनेचा ३५ किलो मोफत धान्याचा लाभ मिळावा ; सुशांतदळवी

दिव्यांगांना रेशनदुकानावरील अंत्योदय योजनेचा ३५ किलो मोफत धान्याचा लाभ मिळावा ; सुशांतदळवी

*कोकण Express*

*दिव्यांगांना रेशनदुकानावरील अंत्योदय योजनेचा ३५ किलो मोफत धान्याचा लाभ मिळावा ; सुशांतदळवी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील दिव्यांगांना रेशनदुकानावरील अंत्योदय योजनेचा ३५ किलो मोफत धान्याचा हक्काचा लाभ मिळवून देणेबाबत आमच्याकडे मागणी होत आहे. त्या मागणीचा विचार करता तालुक्यातील दिव्यांगांना रेशनदुकानावरील अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत जनार्दन दळवी यांची कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांच्याकडे मागणी केली.

दिलेल्या निवेदनात,श्री. दळवी यांनी आमच्या गावात असलेल्या सर्व दिव्यांग बांधवांचा त्यांच्या शाश्वत आर्थिक उत्पन्नासाठी व भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयात नोंदणी करण्यासाठी कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात एक दिवसाचे शिबिर आम्ही आयोजित केले होते . त्यावेळी मला कुडाळ – वेंगुर्ले वरुन आलेल्या काही दिव्यांगांकडून सूचना आल्या की शासनाकडून वय वर्ष १८ पेक्षा जास्त असलेल्या व रेशनकार्डवर कुटुंबप्रमुख म्हणून नोंद असलेल्या अपंगांसाठी अंत्योदय योजनेचा लाभ मिळतो . तरी हा लाभ आम्हाला तुम्ही मिळवून द्यावा अशी मागणी माझ्याकडे केली . तरी मी माझ्या कळसुली गावातील अशा लाभार्थ्यांची व शिल्लक असलेल्या अंत्योदय योजनेच्या तरतूदीची माहिती संबंधित पुरवठा अधिका – यांकडून घेतली . तरी कळसुली गावातील व संपूर्ण तालुक्यातील अपंगांना लवकरात लवकर या अंत्योदय योजनेचा लाभ मिळेल अशी मी आशा करतो . व आपण यावर केलेल्या कार्यवाहीची लेखी स्वरुपात मला माहिती मिळावी,अशी मागणी सुशांत दळवी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!