*कोकण Express*
*शिष्यवृत्ती परीक्षेत कनेडी हायस्कूलचे सुयश*
*तनुश्री मसुरकर राज्यात २५ वी*
*कणकवली : मयुर ठाकूर*
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये कनेडीगट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, एम्. एम्. सावंत जुनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून प्रशालेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तनुश्री प्रसाद मसुरकर हिने राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती परीक्षा 2021 प्राप्त करतं एक नवा इतिहास रचला आहे. राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती मध्ये तिने चतुर्थ क्रमांक,राज्यात 25वा व जिल्ह्यामध्ये चतुर्थ क्रमांक प्राप्त केला आहे.
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अपूर्वा चारूहास आडकर हिने ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त करतं दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व सर्व पदाधिकारी, शालेय समिती खजिनदार गणपत सावंत व सर्व सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील सहायक शिक्षक रामचंद्र भानुसे, प्रसाद मसुरकर,दयानंद कसालकर, मंदार मेस्त्री व सहाय्यक शिक्षिका पल्लवी हाटले, मृणाल साटम, साधना न्हिवेकर व अधिष्ठी सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.