*कोकण Express*
*वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीवर पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकवण्याच्या मार्गावर*
*वैभववाडीवासीयांनी पुढील 5 वर्षांसाठी शहर विकास पूर्ण करण्यासाठी कौल द्या*
*भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांचे आवाहन*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीवर पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकवण्याच्या मूडमध्ये वैभववाडीकर आहेत. नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांची भेट घेतली असता मतदारांनी आपला कल बोलून दाखविल्याचे भाजपा प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी वैभववाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. आमदार नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जठार यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर ताशेरे ओढले. बैलगाडा शर्यत होण्यासाठी कोर्टात आपली ताकद लावून वकिलांची फौज उभी करणारे महाविकास आघाडीचे सरकार ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणावेळी कोर्टात अपयशी ठरले. ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यात राज्यातील महाविकास आघाडीला सुरुंग लागला असून राज्यातील सरकार कधीही कोसळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे वैभववाडीवासीयांनी पुढील 5 वर्षांसाठी शहर विकास पूर्ण करण्यासाठी कौल द्या असे आवाहन जठार यांनी केले. वैभववाडी शहराचा पाणी प्रश्न कायमचा निकालात लावण् यासाठी भाजपा प्राधान्य देणार आहे.वैभववाडी शहरातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी भाजपाला साथ द्या असे आवाहन जठार यांनी वैभववाडीवासीय मतदारांना केले.