*कोकण Express*
*▪️अन्न धान्यांचे संकरीत करण झाल्याने उत्पादन वाढले मात्र जीवन सत्वांचा ढाचाच ढासळला*
*▪️कोकणात दुध् उत्पादन करणे जिकीरीचे ,हवामान पोषक नाही ,प्रशिक्षणाची आवश्यक्ता*
*▪️स्व. सुनिल तळेकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दुग्ध व शेती विषयक मार्गदर्शन*
*कासार्डे ः संजय भोसले*
भारतातील शेतकरी कष्टाळू असून विपरीत परिस्थितीतही अन्नधान्याचे उत्पादन घेत असतो ही देशाच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. हरितक्रांती नंतर शेती तंत्रज्ञानात खूप मोठे बदल झाले. अन्नधान्याचे संकरित बियानाणी शेती उत्पादन वाढले. आणि ते वाढवण्यासाठी रासायनिक खते व द्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला त्यामुळे अन्नधान्य मुबलक झाले ,ते फक्त मुबलक असून उपयोग नाही तर रसायनमुक्त हवे.शिवाय रासायनिक खते देत असताना जमिनीचा पोत विचारात घेतला जात नाही यामुळे उपजत जिवाणूंचा नाश होतो व कालांतराने जमीन नापिक बनते तिचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यासाठी घनजीवामृत चा वापर करावा जमिनीची गुणवत्ता वाढवणे व खर्च कमी करणे तसेच सामुदायिक शेती करणे असे अनेक उपाय योजता येतील व शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतकरी सधन बनवता येईल. असे प्रतिपादन प्राध्यापक भास्कर काजरेकर यांनी तळेरे येथे केले.
ते स्वर्गीय सुनील तळेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्री खर्जा देवी दूध उत्पादन संस्था तळेरे आणि ज्येष्ठ नागरिक संघ तळेरे आयोजित दूध व्यवसाय व शेती विषयक मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत तळेरे दशक्रोशीतील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना व्यासपीठावरून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर डॉक्टर देसाई दुग्धव्यवसाय तज्ञ (किर्लोस कृषी महाविद्यालय ) श्रीनिवास पळसुले(चॅरीटेबल ट्रस्टी) , चंद्रकांत तळेकर माजी अध्यक्ष सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट , विष्णू भोगले ( खर्जा देवी दुग्ध व्यवसाय संघ तळेरे) राजू माळवदे, सुरेश तळेकर (ट्रस्टचे अध्यक्ष), विनय पावस्कर (सुनील तळेकर वाचनालयाचे अध्यक्ष), राजू वळंजू (वाचनालय उपाध्यक्ष) डॉक्टर बावधनकर, डॉक्टर विजय पोकळे, कु. चव्हाण ( कृषी सहाय्यक साळिस्ते तळेरे दशक्रोशी), डी एस पाटील, अशोक मुद्राळे ,बापू तळेकर .आदी मान्यवर उपस्थित होते.
दुग्धव्यवसाय तज्ञ डॉक्टर देसाई यांनी आपल्या मनोगतात सांगितले की दुग्धोत्पादन हा एक उत्तम व्यवसाय असून हमखास आर्थिक वृद्धी करून देणारा आहे. मात्र कोकणचे हवामान या व्यवसायासाठी अनुकूल नसून येथे सुकाळ आणि दुष्काळ असा अनुभव येतो. तसेच देशी गाईंच्या पालनावर अधिक भर द्यावा यासाठी गीर जातीच्या गाई उत्तम आहेत गिर अथवा गावठी गाई चे दुध औषधी असून म्हशीच्या दुधापेक्षा ते स्वस्त असते. म्हैशींमध्ये अनेक प्रजाती असून संकरित वाणाच्या जनावरा कडे (गाई म्हशी) शेतकऱ्यांचा विशेष कल दिसून येतो. मात्र सतत संकर झाल्याने पुढील पैदास निकृष्ट निपजते. म्हणून दर तीन वर्षांनी वळू बदलण्यात यावा. तसे कोकणात दूध उत्पादन करणे जिकिरीचे असले तरी आवश्यक प्रशिक्षण मिळाल्यास त्यावर मात करता येईल.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून तळेरे परिसरातील विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थी आणि समाजसेवी व्यक्तींना सन्मानपत्र व पुष्प देऊन गौरवण्यात आले. यामध्ये परेश नातू (तोंडवली )यांना दूध व्यवसाय उत्पादनाबद्दल शाल श्रीफळ देऊन गौरवले तर विजय तळेकर यांचाही सत्कार करण्यात आला तसेच इतर सत्कार मूर्ती मध्ये योगेश महाडिक (पीएचडी मिळाल्याबद्दल ), कौस्तुभ बावधनकर (डॉक्टर पेशातील उच्च डी एम पदवी प्राप्त), संकेत पोकळे एमडी ला प्रवेश ,अर्णव पिसे नीट परीक्षा उत्तीर्ण. एम बी बी एस ला प्रवेश, दिव्या खटावकर (वकील ),सचिन पावसकर (सामाजिक कार्य) स्वखर्चाने स्मशानभूमीत शेड बांधले .प्रमोद कोयंडे (सोबतीन हा कथासंग्रह पुरस्कार प्राप्त)
त्या सर्वांना स्वर्गीय सुनील तळेकर यांचे सन्मानचिन्ह देऊन व पुष्प देऊन गौरविण्यात आले यावेळी काही ज्येष्ठ नागरिकांचाही सत्कार करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुमारी वर्षा केसरकर हिने केले. शेवटी सर्वांचे आभार मानून व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

