*कोकण Express*
*युवासेनाप्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बळीराजा आत्मसन्मान योजनेचा आज शुभारंभ*
*भैरीभवानी प्रतिष्ठान चे अध्यक्ष, शिवसेना नेते अतुल रावराणे यांचा सामाजिक उपक्रम*
*50 हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी 10 काजूकलामांसह खताचे करणार मोफत वाटप*
*सिंधुदुर्ग ः*
शिवसेना नेते तथा भैरीभवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांच्या संकल्पनेतून युवासेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवासाच्या औचित्याने कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बळीराजा ‘आत्मसन्मान’ योजनेचा शुभारंभ 13 जून रोजी करण्यात येत आहे. तिन्ही तालुक्यातील गरजू आणि होतकरू शेतकऱ्याना वेंगुर्ले 4 आणि वेंगुर्ले 7 जातीची प्रत्येकी 10 काजूकलमे व 5 किलो सेंद्रिय खत मोफत दिले जाणार असून एकूण 50 हजार काजूकलमांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. जुलै 2020 पासुन या योजनेचा शुभारंभ झाला. मागील वर्षी या योजनेच्या माध्यमातून काम कलम (वेंगुर्ला 4 व 5) जातीची काजु कलमे, वितरीत करण्याचा संकल्प होता. मात्र काजू लागवड हंगाम संपल्यामुळे 27 हजार काजू कलमे गरजू शेतकरी बांधवांना वाटण्यात आली. नुकतीच पावसाला सुरुवात झाली असून काजू लागवडीचा हंगाम सुरू झाला आहे. ह्यावर्षी भैरीभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून 50 हजार वेंगुर्ले 4 वेंगुर्ले 7 काजू कलमे गरजू व होतकरु शेतकरी बांधवांना वितरीत करून त्यांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा प्रतिष्ठान चा मानस आहे. त्याच प्रमाणे मागील वर्षी प्रमाणे सेंद्रिय खत सुद्धा शेतकरी बांधवांना मोफत दिले जाणार आहे.
प्रत्येक गरजू शेतकऱ्यांना मोफत प्रत्येकी दहा काजू कलमे आणि ५ किलो सेंद्रिय खत हे लागवडी साठी मोफत दिले जाणार आहे. वेंगुर्ले 4 आणि वेंगुर्ले 7 जातीची ही काजूकलमे असणार आहेत. त्यासाठी शेतकरी बांधवांनी दि. 13 जूनपासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी जमिनिचा सात – बारा, आधार कार्ड व वास्तव्याचा पुरावा घेवून याची नोंदणी करावी. गरजु व होतकरू शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. वैभववाडी कणकवली व देवगड या तीन तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या योजनेचा नोंदणी करून लाभ घ्यावा असे आवाहन भैरीभवानी प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी वैभववाडी तालुका – लक्ष्मण (राजू) रावराणे मोबा.9860597412 मंगेश लोके – मोबा. 9850407221 महेश रावराणे मोबा 7720011103, रोहन रावराणे, संतोष बोडके, प्रदिप रावराणे, रणजीत तावडे, स्वप्निल रावराणे धुळाजी काळे, कणकवली तालुका – प्रथमेश सावंत मोबा 8669779999, राजु राठोड मोबा. 9423339922, महेश (गोट्या) कोळसुलकर मोबा. 8329084030 सुभाष सावंत मोबा. 9359456819, सिद्धेश राणे, तेजस सावंत, देवगड तालुका – राजु तावडे मोबा. 9405927650, विलास साळसकर मोबा. 9421283031, गणेश साळगांवकर, मिलिंद साटम, निनाद देशपांडे, गणेश वाळके, सुनिल तेली, अतुल आंबेरकर, सचिन जोईल यांच्याशी संपर्क साधावा.

