*कोकण Express*
*फणसगांव येथील प्रा. आ. केंद्राला मिळाली ॲम्बुलन्स*
*जि. प. सदस्य प्रदीप नारकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न*
*देवगड ः प्रतिनिधी*
प्राथमिक आरोग्य केंद्र, विठ्ठलादेवीगांव-फणसगांव करीता सुसज्ज व अद्ययावत ॲम्बुलन्स मिळावी, अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांनी लेखी पत्रव्यवहाराद्वारे केली होती. तसेच सातत्याने पाठपुरावा देखील चालवला होता. त्या प्रयत्नांना यश मिळून सिंधुदुर्ग खनिज प्रतिष्ठान अंतर्गत (खनिकर्म) पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दि. 15 मे, 2021 रोजी सभा संपन्न झाली. यामध्ये 12 ॲम्बुलन्स मंजूर करण्यात आल्या. या मंजूर यादीमध्ये देवगड तालुक्यातील फणसगांव आरोग्य केंद्राचा समावेश झाल्याने फणसगाव प्रा. आ. केंद्राला नवीन अँब्युलन्स प्राप्त झाली आहे. या अँब्युलन्सचे जि. प. सदस्य प्रदिप नारकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला गृहीत धरून काही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते ‘खोटं बोला पण रेटून बोला’ अशा ऊक्तीप्रमाणे फसविण्याचे काम करीत आहेत. परंतु सिंधुदुर्गातील जनता सुशिक्षित व सुज्ञ आहे.त्यांना योग्य-अयोग्य, चांगलं-वाईट याची कल्पना आहे. सिंधुदुर्ग खनिज प्रतिष्ठान (खनिकर्म)चे अध्यक्ष हे पालकमंत्री आहेत आणि याकरिता निधी पालकमंत्र्यांमार्फतच मंजूर करण्यात आला, हे माहीत असतानाही कोकणात नारळ पिकतात म्हणून नारळ फोडून श्रेय घेण्यासाठीची लगबग नेते आणि कार्यकर्ते करताना दिसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या ॲम्बुलन्स मंजूर केल्यात त्याचे श्रेय पालकमंत्री उदय सामंत त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नांना जाते. फुकाचा श्रेयवाद घेणाऱ्यांनी त्याची कागद पत्रे जाहीर करावीत, असे जि. प. सदस्य प्रदिप नारकर तसेच पोंभूर्ले शिवसेना विभागप्रमुख तथा विठ्ठलादेवीगाव सरपंच दिनेश नारकर यांनी म्हटले आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षणचे उपजिल्हा प्रमुख अॕड प्रसाद करंदीकर, पोंभूर्ले विभागप्रमुख व विठ्ठलादेवीगांव सरपंच दिनेश शांताराम नारकर, उंडील सरपंच जयेश अशोक नर, बुरंबावडे सरपंच रवी शिंगे, धालवली सरपंच हमजाभाई सोलकर, देवगड तालुका युवा अधिकारी अमेय जठार, विठ्ठलादेवीगांव शाखा प्रमुख देवेंद्र (तात्या) नारकर, अनिल राणे, पाटगांव शाखाप्रमुख संदीप गुरव, विजय गुरव, प्रसाद नारकर, निलेश नारकर, संतोष कार्लेकर, चंदू गुरव, संदीप गुरव तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित ढवळे, डॉ. पल्लवी घोळवे, औषध निर्माता सोनाली म्हेत्रे/घोळवे, जोशी, कांबळे तसेच आरोग्य केंद्रातील सर्व कामगार कर्मचारी वृंद उपस्थित होते.