*कोकण Express*
*सरपंच हेमंत मराठे यांच्या प्रयत्नाने अखेर सावंतवाडी मळेवाड मार्गावरील गतिरोधकाना पट्टे मारण्याचे काम सुरू..*
सरपंच हेमंत मराठे यांच्या प्रयत्नाने अखेर सावंतवाडी मळेवाड मार्गावरील गतिरोधकाना पट्टे मारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
सावंतवाडी मळेवाड मार्गावर मळेवाड गावात मोठया प्रमाणात गतिरोधक घालण्यात आलेले आहेत.या गतिरोधकाना रंग न काढल्याने वाहन धारकांना ते गतिरोधक दिसत नसल्याने खुप वेळा अपघात होत होते. यामुळें मळेवाड कोंडूरे सरपंच हेमंत मराठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारि याना भेटून सदरच्या गतीरोधकाना रंगरंगोटी करावी जेणेकरुन अपघात होणार नाही अशी मागणी केली होती. त्या मागणीनुसार मळेवाड गावातील गतिरोधकाना रंगरंगोटी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळें वाहन धारक व ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.