*कोकण Express*
*सत्ताधार्यांना जमत नसेल तर जिल्हयातील रुग्णांची जबाबदारी भाजपा घेण्यास तयार…*
*कोल्हापुरच्या धर्तीवर सिंधूदूर्गात “टास्क फोर्स”ची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार…*
*भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
जिल्ह्यातील हॉस्पिटलची परिस्थिती सुधारण्यासाठी पालकमंत्री व आमदार असफल ठरले आहेत. त्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगून जिल्यातील व्हेंटीलेटर सुरू करण्यात यावे,अन्यथा तुम्हाला जमत नसतील तर तसे जाहीर करा,आम्ही भाजपा म्हणून तो प्रश्न सोडवू,असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे केला.दरम्यान कोल्हापुरच्या धर्तीवर सिंधूदूर्ग जिल्ह्यात टास्क फोर्स सुरू करण्यात यावी,अशी मागणी जिल्हा भाजपाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करणार आहे,असे त्यांनी सांगितले. श्री.तेली यांनी आज येथे झुमच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्यांनी आमदार दिपक केसरकर यांच्यासह पालकमंत्री उदय सावंत यांच्यावर टिका केली.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब,शहराध्यक्ष अजय गोंदावळे,नगरसेवक आनंद नेवगी,बंटी पुरोहीत केतन आजगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी तेली पुढे म्हणाले, पालकमंत्री उदय सामंत व स्थानिक आमदारांना राज्यात कोणी विचारत नाही,त्यामुळे आवश्यक यंत्रसामुग्री आणि यंंत्रणा मिळविण्यासाठी ते कमी पडले आहेत, ही वस्तूस्थिती आहे. कोरोनाच्या काळात आरोग्य प्रशासनाला हवा तसा सत्ताधार्यांकडुन “बॅकअप” मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडुन मोठ्या प्रमाणात काम करून सुध्दा म्हणावे तसे यश मिळत नाही.आजही जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर तीन रुग्ण हे रुग्णवाहीकेत आहेत, ही स्थिती अत्यंत धोकादायक आणि चिंताजनक आहे,असे त्यांनी सांगितले.
श्री तेली पुढे म्हणाले, स्थानिक आमदार दिपक केसरकर हे घोषणाच्या पलीकडे काही करताना दिसत नाहीत, जसे अमेरीकन स्प्रे देतो असे सांगितले, त्याच प्रमाणे त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन दिला आहे, त्यामुळे व्हेंटीलेटर बेड देतो असे सांगितले होते.मात्र मुळात त्या ठिकाणी व्हेंटीलेटर सुरूच नाही ही वस्तूस्थिती आहे,असेही तेली म्हणाले.

