राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दीपक मयेकर यांचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दीपक मयेकर यांचे निधन

*कोकण Express*

*राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दीपक मयेकर यांचे निधन…*

*मालवण ः प्रतिनिधी*

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष तसेच बाजारपेठेतील राज रेस्टॉरंट आणि बेकरीचे मालक दिपक बळवंत मयेकर (वय-५६) रा. धुरीवाडा यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.

मयेकर हे उत्कृष्ट डावखुरे फलंदाज म्हणून ओळखले जात. टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर टर्फ साकारण्यात त्यांचे मोठे योगदान होते. क्रिकेटमधील त्यांच्या योगदानामुळे त्यांना क्रीडाप्रेमी मालक या नावाने संबोधत असत. वडील बळवंत मयेकर यांच्या साथीने बाजारपेठेतील राज रेस्टॉरंट आणि बेकरी व्यवसायाच्या प्रगतीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. भंडारी हायस्कूलच्या स्थानिक समितीचे कार्यकारिणी सदस्य, भंडारी पतसंस्थेचे संचालक तसेच भंडारी समाज मंडळाच्या विविध कामांमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला होता.
आज दुपारी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, भाऊ, भावजयी, पुतणे, जावई असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!