पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून कळसुली गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध – सरपंच सचिन पारधीये

पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून कळसुली गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध – सरपंच सचिन पारधीये

*कोंकण एक्सप्रेस*

*पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून कळसुली गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध – सरपंच सचिन पारधीये*

*परबवाडी सुद्रीक वाडी रस्ता दोन्ही वाड्यांना जोडणारा प्रगतीचा मार्ग ठरेल*

*जि.प.सदस्या शितल दळवी यांच्या हस्ते परबवाडी रस्त्याचा श्रीफळ वाढवून शुभारंभ*

*कणकवली ः संजना हळदिवे*

विकासाचे महामेरु कर्तव्यदक्ष पालकमंत्री श्री. नितेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून १० लाख रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध झाल्यामुळेच कळसुली परबवाडी – सुद्रीक वाडी रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम मार्गी लागले आहे.पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून चाळीस कोटी पेक्षा जास्त निधी कळसुली गावच्या विकासासाठी मिळाला आहे.यापुढेही गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत.हा रस्ता दोन्ही वाड्यांना जोडणारा प्रगतीचा मार्ग ठरेल.असे प्रतिपादन कळसुली सरपंच सचिन पारधीये यांनी केले.

कळसुली परबवाडी श्री .महापुरुष मंदिर ते सुद्रिकवाडी या मुख्य रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचे उद्घाटन नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सौ.शितल दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यावेळी सरपंच सचिन पारधीये बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ.शितल दळवी,उपरसरपंच संजय परब,जयवंत घाडीगावकर,
प्रवीण दळवी, दीपक मेस्त्री,अमित दळवी, स्वप्निल गोसावी,
लक्ष्मण परब,
शरद सावंत,
हेमंत वारंग, विश्वनाथ लाड,लाडू गावकर,
सतीश तेली,बाबू मेस्त्री,योगेश परब,
रामचंद्र सावंत आदी उपस्थित होते

पुढे बोलताना सरपंच सचिन पारधीये म्हणाले की,आज परबवाडीतील ही उत्साही तरुण मुले पालकमंत्री नितेश राणे साहेबांच्या विचाराने आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वाडीच्या हितासाठी प्रेरित झाली आहेत.

भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री यांचे या रस्त्यासाठी योगदान राहिले आहे.
.जेव्हा आपण एकजूट होतो तेव्हाच विकास खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचतो.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ.शितल दळवी म्हणाल्या की, पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून कळसुली जिल्हा परिषद मतदार संघातील विकास कामे मार्गी लागतील.त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही.
या रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरणासाठी सरपंच सचिन पारधीये यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.त्यामुळे हे काम मार्गी लागले आहे.

राजकारण हे निवडणुकीपुरते असावे पण विकास हा सर्वांसाठी असतो.
कळसुली परबवाडी – सुद्रीक वाडी रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण होत असल्याने परबवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.यावेळी उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ आणि भाजप कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!