स्त्रीशक्ती उभी खंबीर… साक्षीताईंचा विजय निश्चित..!

स्त्रीशक्ती उभी खंबीर… साक्षीताईंचा विजय निश्चित..!

*कोंकण एक्सप्रेस*

*स्त्रीशक्ती उभी खंबीर… साक्षीताईंचा विजय निश्चित..!*

*दोडामार्ग.: शुभम गवस*

कोनाळ मतदार संघातील अपक्ष उमेदवार सौं. साक्षी संदिप देसाई यांनी प्रचाराला सुरुवात केली असून घडलेल्या प्रसंगांना न डगमगता त्या नव्या आत्मविश्वासाने पुन्हा जनतेसमोर उभ्या ठाकल्या आहेत. संकटांना सामोरं जात स्त्रीची जिद्द आणि धैर्य काय असतं, याचं उदाहरण त्या आपल्या कार्यातून दाखवत आहेत.
अपक्ष उमेदवार असूनही सर्वसामान्य नागरिक तसेच महिला वर्गाकडून त्यांना मिळणारा वाढता प्रतिसाद हा त्यांच्या प्रामाणिकपणावर आणि काम करण्याच्या तळमळीवर जनतेचा विश्वास दर्शवत आहे. साक्षीताईंच्या पाठीशी स्त्रीशक्ती खंबीरपणे उभी राहत असून त्यांच्या प्रचारातून मतदार संघात आशा, विश्वास आणि परिवर्तनाची नवी ज्योत पेटताना दिसत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!