*कोंकण एक्सप्रेस*
*खाजगी पसंत शाळा, नेरूर करमळगाळव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त इतिहास साधनांची माहिती व प्रदर्शन!*
*कुडाळ : प्रतिनिधि*
दि. २६ जानेवारी २०२६ रोजी खाजगी पसंत शाळा नेरूर करमळगाळव या शाळेत ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेचे माजी विद्यार्थी तथा माजी सैनिक श्री. विजय गोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, ध्वजगीत समूहगीत सादर करण्यात आले. तसेच मुलांनी संगीत कवायत सादर केली. यावेळी ‘असाक्षर मुक्त गावाची’ शपथ घेण्यात आली. यावेळी श्री. विजय गोडे, माजी सैनिक यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान, यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहासाची साधने व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांना ऐतिहासिक शस्त्रांची प्रत्यक्ष अनुभूती व माहिती देण्यात आली. इतिहास हा केवळ भावनांवर आधारित नसून तो पुराव्यावर सिद्ध होतो व त्यामुळेच टिकून राहतो, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री. ज्ञानेश्वर राणे यांनी केले.

कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश राणे, संस्था पदाधिकारी श्री. यशवंत ठुंबरे, मुख्याध्यापक श्री. सचिन तुळसुलकर सर , सहाय्यक शिक्षक श्री. अमोल तांबे सर, अंगणवाडी सेविका श्रीम. परब, श्रीम. गावडे, मदतनीस श्रीम. गावडे, श्री. दिपक गावडे, श्री. सुनिल सरमळकर, श्री. सचिन राणे श्रीम. राणे, श्रीम. शिरसाट श्रीम.सरमळकर श्रीम. तेंडोलकर, श्रीम सडवेलकर., श्रीम. चौधरी श्रीम.दांडेकर श्रीम. वारंग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

