श्रीदेव जठार बाबा आशीर्वादाने सोनिया कुबल-नाईक यांचा प्रचार जोमात..

श्रीदेव जठार बाबा आशीर्वादाने सोनिया कुबल-नाईक यांचा प्रचार जोमात..

*कोंकण एक्सप्रेस*

*श्रीदेव जठार बाबा आशीर्वादाने सोनिया कुबल-नाईक यांचा प्रचार जोमात..*

*दोडामार्ग: शुभम गवस*

श्रीदेव जठार बाबा यांचे दर्शन घेऊन व आशीर्वाद घेत सौ. सोनिया कुबल-नाईक यांनी आपल्या प्रचाराला अधिक वेग दिला आहे. गावागावात भेटीगाठी घेत त्या मतदारांशी थेट संवाद साधत असून आपल्या विकास कामांचा व भावी नियोजनाचा आराखडा जनतेसमोर मांडत आहेत.
सौ. सोनिया कुबल-नाईक यांच्या पाठीशी त्यांचे पती तसेच भारतीय जनता पक्षाचे सक्रिय युवा नेते अंकुश नाईक यांचे भक्कम पाठबळ आहे. अंकुश नाईक यांचा मणेरी तसेच परिसरातील गावांमध्ये युवक वर्गावर चांगला प्रभाव असून त्यांच्या जनसंपर्कामुळे प्रचाराला अधिक बळ मिळत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी प्रचार बैठका, घरभेटी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.
महायुतीच्या वतीने सौ. नाईक या मणेरी मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरल्या असून स्थानिक पातळीवर त्यांचा प्रचार वेग घेत आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला दिसत असून मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ही लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!