*कोंकण एक्सप्रेस*
*फोंडाघाटचे ‘आरोग्यदूत’ डॉ. सुरेश आपटे यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरव*
*कट्टा मित्र मंडळाकडून विशेष सत्कार*
*फोंडाघाट (प्रतिनिधी): सौ. संजना हळदिवे*
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून फोंडाघाट पंचक्रोशीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली ५० वर्षे अविरत आरोग्य सेवा देणारे ज्येष्ठ चिकित्सक डॉ. सुरेश आपटे यांना जिल्ह्याच्या ‘डॉक्टर फॅटर्निटी क्लब’चा मानाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या सुवर्णमयी कामगिरीबद्दल ‘कट्टा मित्र मंडळ – फोंडाघाट’ तर्फे त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.फोंडाघाट येथील या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने:
* श्रीमती आग्रे (सरपंच, फोंडाघाट)* डॉ. महेश केळुसकर (प्रसिद्ध साहित्यिक)* कुमार नाडकर्णी (ज्येष्ठ पत्रकार)* यशवंत मसुरकर (अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ)
* राजू पटेल (लोकनेते)* शशिकांत तिरोडकर *अनंत पिळणकर *समीर मांगले व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

पन्नास वर्षांचे आरोग्य व्रत :
डॉ. आपटे यांनी केवळ एक व्यवसाय म्हणून नव्हे, तर सामाजिक बांधिलकी म्हणून वैद्यकीय क्षेत्राकडे पाहिले. फोंडाघाट सारख्या ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची वानवा असताना त्यांनी दिलेली सेवा ही ‘आरोग्य स्वातंत्र्य’ मिळवून देण्यासारखीच आहे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
सत्कारमूर्ती डॉ. आपटे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना हा सन्मान सर्व रुग्णांचा आणि फोंडाघाटवासीयांच्या प्रेमाचा असल्याचे सांगितले. कट्टा मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.

