फोँडकन देवी स्पोर्ट्स अकॅडमी चा ” हर्षित नाईक चे ८० मी. धावणे व लांब उडी स्पर्धे दणदणीत सुयश

फोँडकन देवी स्पोर्ट्स अकॅडमी चा ” हर्षित नाईक चे ८० मी. धावणे व लांब उडी स्पर्धे दणदणीत सुयश

*कोंकण एक्सप्रेस*

*फोँडकन देवी स्पोर्ट्स अकॅडमी चा ” हर्षित नाईक चे ८० मी. धावणे व लांब उडी स्पर्धे दणदणीत सुयश….*

*सिंधुदुर्ग*

सिंधुदुर्ग ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा हॉशी अथलेटिक्स असोसिएशन, सिंधुदुर्ग आयोजीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सब. ज्युनियर मैदानी (अथलेटिक्स )स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पोईप गावातील श्री फोँडकन देवी स्पोर्ट्स अकॅडमी, निरोम या क्रीडा प्रशिक्षण केंद्र मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या सौ. आय. डी. वर्धमान हायस्कूल माध्यमिक विद्यालय, पोईप, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग या शाळेत शिक्षण घेणाऱ्या कु. हर्षित संतोष नाईक यांनी १४ वर्षा खालील मुले या गटात ८० मी. धावणे मध्ये द्वितीय क्रमांक रोप्य पदक , व लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णा पदक व प्रविण्या प्रमाणपत्र मिळवले.त्याची निवड राज्यस्तरीय सब. ज्युनियर अथलेटिक्स स्पर्धा दि. ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी कोपरगाव, आहोल्यानगर येथे होणार आहे. त्याचे मार्गदर्शक श्री. समीर जयवंत राऊत याच्या मार्गदर्शना खाली प्रशिक्षण घेतले. तसेच संस्थेच्या वतीने श्री. संतोष नाईक (पालक ), कु. अंजली जयसिंग गायकवाड (महिला क्रीडा प्रशिक्षक ), प्रमुख मार्गदशक. श्री. समीर जयवंत राऊत, सौ. सुवर्णा जोशी (सचिव ), श्री. बाळकृष्ण अ. कदम, श्री.डॉ.प्रमोद घाडीगावकर (पालक प्रतिनिधी ) समस्त ग्रामस्थ, व शाळेचे क्रीडा शिक्षक यांनी त्याचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!