शिवसेना दोडामार्ग तालुक्यात महिला संघटनेला मोठा धक्का; चेतना गडेकर यांचा राजीनामा

शिवसेना दोडामार्ग तालुक्यात महिला संघटनेला मोठा धक्का; चेतना गडेकर यांचा राजीनामा

*कोंकण एक्सप्रेस*

*शिवसेना दोडामार्ग तालुक्यात महिला संघटनेला मोठा धक्का; चेतना गडेकर यांचा राजीनामा*

*दोडामार्ग : शुभम गवस*

शिवसेना दोडामार्ग तालुक्यात महिला संघटनेला धक्का देणारी घटना घडली असून, महिला तालुका प्रमुख सौ. चेतना चित्रसेन गडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा शिवसेना महिला जिल्हा प्रमुखांकडे सादर केला आहे.
राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी समाजकार्याच्या उद्देशाने व सामान्य जनतेसाठी काम केल्याचे नमूद केले आहे. महिलांचे प्रश्न, तळागाळातील जनतेच्या समस्या तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले आहे. जनतेशी थेट संपर्कामुळे आपल्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या; मात्र योग्य वेळी पक्षाकडून संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
जनतेसाठी काम करताना उमेदवारीची गरज होती, परंतु ती नाकारण्यात आल्याने आपल्या भावना दुखावल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर महिला तालुका प्रमुख पदाचा राजीनामा देत, तात्काळ कार्यमुक्त करण्याची विनंती त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे.
या राजीनाम्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाबाबत चर्चांना उधाण आले असून, येत्या काळात त्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!