कोलगाव जिल्हा परिषद साठी भाजपमधून महेश सारंग यांचा अर्ज दाखल

कोलगाव जिल्हा परिषद साठी भाजपमधून महेश सारंग यांचा अर्ज दाखल

*कोंकण एक्सप्रेस*

*कोलगाव जिल्हा परिषद साठी भाजपमधून महेश सारंग यांचा अर्ज दाखल*

*निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघामधून आज अधिकृत उमेदवार म्हणून भाजपच्या माध्यमातून महेश सारंग यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निष्ठावान कार्यकर्त्याला पक्षांमध्ये नेहमीच संधी दिली जाते, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी उमेदवारी देणाऱ्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.

श्री. सारंग यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जनतेची साथ आणि कार्यकर्त्यांचा भक्कम पाठिंबा आपल्या पाठीशी असल्यामुळे आगामी निवडणुकीत आपला विजय हा भरघोस मतांनी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी, स्थानिक नेते, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!