*कोंकण एक्सप्रेस*
*तुलसीच्या पावन भूमीत घुमणार भजनाचा स्वर..! ‘श्री श्रृंगेश्वर गणपती मंदिरात’ माघी गणेश जयंती सोहळ्याचे आयोजन*
*हरकुळ खुर्द (दळवीवाडी-वडण): सौ.संजना हळदिवे*
दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवार, दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी ‘श्री श्रृंगेश्वर गणपती मंदिर’ येथे माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. श्री श्रृंगेश्वर मित्रमंडळ आणि श्री तुकाराम रघुनाथ रासम (सी.ए.) यांच्या वतीने या सोहळ्याचे नेटके नियोजन करण्यात आले आहे.
दिवसभराचे भरगच्च कार्यक्रम:
दिवसाची सुरुवात सकाळी ६ वाजता ‘अभिषेक’ आणि ‘श्री सत्यविनायक महापूजेने’ होईल. त्यानंतर दिवसभर विविध नामवंत भजन मंडळांची भजने आणि ‘समई नृत्य’ अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे.


भजन सेवा: ऋषिकेश धुरी (फोंडाघाट), अखिलेश फाळके (घालवली), नरेंद्र गुरव (आचिर्णे), कविता भुजंग राऊत (आचिर्णे) आणि राजन चिंदरकर (करजे) यांसारख्या दिग्गज बुवांची भजने रंगणार आहेत.
विशेष आकर्षण: दुपारी ब्राह्मणदेव महिला मंडळ (भोळेवाडी) यांचे ‘समई नृत्य’ आणि रात्री ९:३० वाजता ‘नाईक मोचेमाडकर दशावतारी मंडळाचे’ ‘नील माधव’ हे पौराणिक नाटक सादर होईल.
दुपारी १ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री श्रृंगेश्वर मित्रमंडळाने केले आहे

