चाफेड भोगलवाडी येथील श्री गायगोठण गणपती मंदिरात 22 जाने. रोजी माघी गणेश जयंती उत्सव सोहळा

चाफेड भोगलवाडी येथील श्री गायगोठण गणपती मंदिरात 22 जाने. रोजी माघी गणेश जयंती उत्सव सोहळा

*कोंकण एक्सप्रेस*

*चाफेड भोगलवाडी येथील श्री गायगोठण गणपती मंदिरात 22 जाने. रोजी माघी गणेश जयंती उत्सव सोहळा*

*शिरगांव :संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील चाफेड – भोगलेवाडी येथील श्री गायगोठण गणपती मंदिरात गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी सायं. 3.30 ते 6 वा. हळदीकुंकू समारंभ, सायं. 7 ते 10 वा. विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम, गुरु. दि. 22 जाने. रोजी स. 8 ते 11 वा. विविध धार्मिक विधी, अभिषेक, मंत्र पुष्पांजली, दु. 11 ते 12 वा. श्री सत्यनारायण महापूजा, दु. 12 ते 12.30 वा. महाआरती व महाप्रसाद, दु. 12.30 ते रात्री. 9.30 वा. महाप्रसाद, संध्या. 5 ते रात्रौ. 12.30 वा. परिसरातील नामांकित निमंत्रितांची संगीत भजने, रात्रौ. 12.30 ते 5.30 वा. लोकराजा कै. सुधीर कलिंगण यांचे कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर ( संचालक श्री. सिद्धेश कलिंगण ) प्रस्तुत महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी पहाटे 5.30 ते 6 वा. काकडआरती, स. 8 ते 12 वा. उत्तरपूजा व अभिषेक, त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. तरी या सोहळ्याला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री गाय गोठणगणपती मंदिर देवस्थान समिती चे अध्यक्ष प्रफुल्ल परब, उपाध्यक्ष प्रशांत राणे, खजिनदार सचिन परब, सरचिटणीस संतोष भोगले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!