*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित गणित प्राविण्य परीक्षा सन २०२५- २६ सुरळीत पणे पार*
*कनकवली : प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ सलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित गणित प्राविण्य परीक्षा सन २०२५- २६ जिल्ह्यातील आठ विविध केंद्रावर रविवार दी. १८ जानेवारी रोजी घेण्यात आली. त्यामध्ये कणकवली तालुका अध्यापक मंडळाची गणित प्राविण्य परीक्षा विद्या मंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली इयत्ता पाचवी,आठवी या दोन वर्गासाठी घेण्यात आली होती. यावेळी विध्यार्थ्यांसोबत पालकांनीही या केंद्रावर मोठया प्रमाणावर गर्दी केली होती.

गणित प्राविण्य परीक्षेत इयत्ता पाचवी ९६ विद्यार्थी व इयत्ता आठवी ८३ विद्यार्थी असे एकूण १७९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते या परीक्षेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षा तसेच स्पर्धा परीक्षा यांची खूप मोठ्या प्रमाणात तयारी होते व विदयार्थ्यांना गणितामध्ये एक आवड निर्माण होते जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रसाद हनुमंत कुबल व कार्यवाहक धोंडी रवींद्र गावडे तसेच परीक्षा प्रमुख महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा विद्या मंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली या केंद्रावर आयोजित केली होती.
या परीक्षेसाठी जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र भानुसे व जिल्हा सहकार्यवाहक भागेश कदम कणकवली तालुका अध्यक्ष संदीप नागभिडकर व कणकवली सहकार्यवाहक श्रीमती पाटील उपस्थित होते. ही परीक्षा पार पाडण्यासाठी शिक्षक खरात , जाधव, पवार , तसेच हरकुलकर यांचे मोलाचे योगदान लाभले. विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली मध्ये ही परीक्षा सकाळी ११ते २ या वेळेत सुरळीत पणे पार पडली.

