अॅड. अनिल निरवडेकर सावंतवाडीचे नवे उपनगराध्यक्ष

अॅड. अनिल निरवडेकर सावंतवाडीचे नवे उपनगराध्यक्ष

*कोंकण एक्सप्रेस*

*अॅड. अनिल निरवडेकर सावंतवाडीचे नवे उपनगराध्यक्ष*

*स्वीकृत नगरसेवक पदी अॅड सिद्धार्थ भांबोरे, अॅड नीता सावंत कविटकर यांची निवड..*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुती न झाल्याचे स्पष्ट झाले असून, भाजपचे तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्ती अॅड. अनिल निरवडेकर यांना उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे आज झालेल्या निवडणुकीत पाच मतांनी त्यांचा विजय झाला असून, त्यामुळे शिंदे शिवसेनेला अखेर विरोधी बाकावर बसावे लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तर काँग्रेस व ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकांनी तटस्थ भूमिका बजावली.

दरम्यान, स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडून अँड. सिद्धार्थ भांबुरे तर शिंदे शिवसेनेकडून अॅड. नीता सावंत कविटकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीप्रसंगी उपस्थित मान्यवर व नगरसेवकांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी संदीप गावडे, मनोज नाईक, दिलीप भालेकर, विनोद राऊळ, विलास जाधव, बबन डिसोजा, आदी उपस्थित त्यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!