*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळ तालुक्यातील अणाव गावात आज ‘सेलिब्रिटी गावभेट’ कार्यक्रम उत्साहात पार*
*कुडाळ : प्रतिनिधी*
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कुडाळ तालुक्यातील अणाव गावात आज ‘सेलिब्रिटी गावभेट’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांची यावेळी उपस्थिती लाभली. त्यांचे गावाच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, अभिनेते पृथ्वीक प्रताप व अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांनी ग्रामस्थांशी संवाद या अभियानात अव्वल स्थान प्राप्त करण्यासाठी सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन अभियान यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, सरपंच लिलाधर अणावकर, उपसरपंच आदिती अणावकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रदीप नारकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष विनायक अणावकर, संदीप परब यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच लिलाधर अणावकर यांनी ग्रामपंचायतीत राबवण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमादरम्यान पेशंट बँकचे लोकार्पण, ग्रामपंचायतीच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले.

