फ्रिक्वेन्सी प्री-स्कूलच्या स्नेहसंमेलनात चिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग

फ्रिक्वेन्सी प्री-स्कूलच्या स्नेहसंमेलनात चिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग

*कोंकण एक्सप्रेस*

*फ्रिक्वेन्सी प्री-स्कूलच्या स्नेहसंमेलनात चिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग*

*दोडामार्ग :शुभम गवस*

लहान वयात दिले जाणारे शिक्षण व संस्कारच मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया घडवतात. फ्रिक्वेन्सी प्री-स्कूलकडून दिले जाणारे संस्कारक्षम शिक्षण मुलांना केवळ शैक्षणिकदृष्ट्या नव्हे तर सुसंस्कृत घडवणारे आहे, असे प्रतिपादन दोडामार्गचे तहसीलदार राहुल गुरव यांनी केले.
दोडामार्ग येथील फ्रिक्वेन्सी प्री-स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी पत्रकार तेजस देसाई, जीवन विद्या मिशनचे राजाराम सावंत, नगरसेविका सौ. संध्या प्रसादी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्य, गाणी, अभिनय व नाट्यछटा सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने पालक व मान्यवर भारावून गेले.
लहान वयातच संस्कार, आत्मविश्वास व सर्जनशीलता विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा सहभाग आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका कोमल नाईक यांनी केले. प्रास्ताविक संचालिका कीर्ती खोबरेकर यांनी मांडले, तर आभार शिक्षिका शितल पटकारे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!