*कोंकण एक्सप्रेस*
*परूळेकर दत्त मंदिरात विविध कार्यक्रम*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
वेंगुर्ला येथील परूळेकर दत्त मंदिरात दि. 4 व 5 डिसेंबर या कालावधीत 118 वा दत्तजयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.
दि. 4 रोजी सकाळी 10 वा. श्रीमती कुसुम दिगंबर परूळेकर यांच्या “कुसुमांजली’ या पुस्तकाचे प्रकाशन, दु.12 वा. श्रींची भिक्षा प्रदक्षिणा, सायं.5 वा.ह.भ.प.अरूण सावंत बुवा यांचे दत्तजन्माचे कीर्तन, 7 वा.दत्तजन्म, 8 वा.पालखी प्रदक्षिणा होणार आहे. 5 डिसेंबर रोजी सायं.6.30 वा. पार्सेकर दशावतार मंडळाचा दणदणीत नाट¬प्रयोग होणार आहे. तरी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

