*कोंकण एक्सप्रेस*
*सिनिअर गट राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेत ‘क्रीडा प्रबोधिनी’ अव्वल तर ‘मुंबई संघ’ उपविजेता*
*पुनित बालन प्रस्तूत 52 वी अंधेरीतील सिनियर्स राज्य ज्यूदो स्पर्धा*
*कासाडे प्रतिनिधी ; संजय भोसले*
अंधेरी मुंबई येथील शहाजी राजे भोंसले क्रीडा संकुल येथे नुकत्याच झालेल्या पुनित बालन प्रस्तूत 52 वी महाराष्ट्र राज्य खुली वरिष्ठ गट (सिनियर्स) ज्यूदो स्पर्धेमध्ये शासनाच्या पुणे स्थित क्रीडा प्रबोधिनीने चार सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदके पटकावीत सर्वसाधारण विजेतेपद राखले. विशेष म्हणजे मुलामुलींच्या 14 वजनगटात 12 खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग होता. मुंबईच्या 14 ज्यूदोपटुंच्या सहभाग असलेल्या या संघाने प्रत्येकी तीन सुवर्ण-रौप्य आणि कांस्य अशी नऊ पदके जिंकून सर्वसाधारण उपविजेतेपद मिळविले. ठाण्याच्या संघाने तीन सुवर्ण आणि पाच कांस्य तर पुणे जिल्हा ज्यूदो संघटनेच्या खेळाडूंनी तीन सुवर्ण आणि एक कांस्य पदक जिंकत कडवी लढत दिली. या स्पर्धेतून मणीपुर, इंफाळ येथे ज्यूदो फेडरेशनद्वारा आयोजित राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेत राज्याचा संघ प्रथम आलेल्या खेळाडूंच्या निवडीने अंतिम केला गेला.
दरम्यान, स्पर्धेचे उद्घाटन अंधेरी मुंबईचे खासदार रविंद्र वायकर यांनी दीपप्रज्वलनाने केले. ते म्हणाले की खासदार क्रीडा चषक या 15 खेळांच्या महोत्सवावेळी ज्यूदो राज्य स्पर्धेच्या उद्घाटनाचे आमंत्रण मला मिळाले आणि पुढील वर्षापासून आम्ही हा खेळ मुंबईच्या क्रीडा-कुंभमेळ्यात सामिल करणार असून यापुढे एकूण 16 खेळांच्या स्पर्धकांना संधी दिली जाईल. यावेळी राज्य ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष शैलेश टिळक, महासचिव दत्ता आफळे, मुंबई संघटनेचे अध्यक्ष सुरेश समेळ स्पर्धा आयोजन समिती सचिव सुरेश कनोजिया, यतीश बंगेरा यासह अर्जुन पुरस्कार प्राप्त कावस बिलिमोरिया, उपाध्यक्ष डॉ गणेश शेटकर, कोषाध्यक्ष रविंद्र मेटकर, सहसचिव डॉ. शेखर साखरे, जयेंद्र साखरे, मुकूंद डांगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
दोन दिवसीय आयोजन केलेल्या या स्पर्धेत राज्यातील बीड, सिंधुदुर्ग, धुळे, वर्धा यांसह पुणे, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक आदी 27 जिल्ह्यातील 231 पुरुष आणि महिला खेळाडूंसह 25 पंच, व्यवस्थापक, प्रशिक्षक आणि पदाधिकारी असे साडेतीनशे पाहुण्यांचा सहभाग होता.
स्पर्धेसाठी अमरावतीच्या सचिन देवळे यांची स्पर्धा संचालक पदी तर ठाण्याचे शैलेश देशपांडे, मुंबईच्या शिल्पा सेरीगर आणि दर्शना लाखाणी या आंतरराष्ट्रीय पंचांची जुरी म्हणून नियुक्ती झालेली होती. स्पर्धेमधील नियुक्त पंचांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत अचूक निर्णय देणार्या पंचांमधील सातारा येथील प्रवीण पवार, ठाण्याच्या पूर्वा लोकरे आणि प्रशांत वाणी, धुळे याना रोख रक्कम देवून सन्मानित केले.
स्पर्धेच्या बक्षिस वितरणावेळी बॉलीवूड येथील कलाकारांनी उपस्थिती दर्शविल्याने खेळाडूंचा उत्साह वाढला. चाणक्य यांची भूमिका वठवणारे मनिष वाधवा, सिंघम रिटर्न्स आणि सरकार सिनेमातील झाकीर हुसैन यांसह नवोदित रक्षित वर्मा आदींनी स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. महाराष्ट्र ज्यूदो संघटनेच्या शीर्षक गाण्याचे संगीतकार आणि गायक रामकृष्ण आणि गणेश वाणी या बंधूनी लाईव्ह गीत गाऊन खेळाडूंमध्ये चैतन्य निर्माण केले. स्पर्धकांच्या भोजनाची मोफत व्यवस्था अंधेरी येथील गुरुद्वारा अध्यक्ष जसपालसिंग सुरी यांनी केल्याबद्दल राज्य संघटनेनी त्यांचा विशेष सत्कार केला.
*स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे.*
*मुलींमध्ये -*
४८ किलोखालील गट
सुवर्ण पदक – मिथीला भोसले, ठाणे
रौप्य पदक – आकांक्षा शिंदे, नाशिक
कांस्य पदक – तेजश्री परब, मुंबई
कांस्य पदक – वैष्णवी पाटील, क्रीडा प्रबोधिनी
५२ किलोखालील गट
सुवर्ण पदक – समृद्धी पाटील, क्रीडा प्रबोधिनी
रौप्य पदक – वैष्णवी खलाणे, नाशिक
कांस्य पदक – श्रावणी शितप, पिजेए
कांस्य पदक – वैष्णवी झंझूर्णे, सातारा
५७ किलोखालील गट
सुवर्ण पदक – भक्ती, भोसले ठाणे
रौप्य पदक – श्रावणी, डिके यवतमाळ
कांस्य पदक -अंजली बाभूळकर, क्रीडा प्रबोधिनी
कांस्य पदक – परिज्ञा कस्तुरे, मुंबई
६३ किलोखालील गट
सुवर्ण पदक – आर्य अहिरे, ठाणे
रौप्य पदक – नविया रावळ, मुंबई
कांस्य पदक – शृंखला रत्नपारखी, छत्रपती संभाजीनगर
कांस्य पदक – यज्ञवी सुतार, पिडीजेए
७० किलोखालील गट
सुवर्ण पदक – समीक्षा शेलार, क्रीडा प्रबोधिनी
रौप्य पदक – ऐश्वर्या परब, मुंबई
कांस्य पदक – दिव्या सातपुते, कोल्हापूर
कांस्य पदक – श्रद्धा गिरी ठाणे
७८ किलोखालील गट
सुवर्ण पदक – दानिका शेट्टी, मुंबई
रौप्य पदक – सिद्धी होळकर, अहिल्यानगर
कांस्य पदक – प्रेक्षा बोरकर, ठाणे
कांस्य पदक – तनुजा वाघ नाशिक
७८ किलोवरील गट
सुवर्ण पदक – टियाना दास, मुंबई
रौप्य पदक – शिवानी कापसे, वर्धा
कांस्य पदक – श्रेय होळकर, अहिल्यानगर
*मुलांमध्ये-*
६० किलोखालील गट
सुवर्ण पदक – श्रवण शेडगे, पिजेए
रौप्य पदक – प्रणीत गोडसे, कोल्हापूर
कांस्य पदक – ओम हिंगमिरे, परभणी
कांस्य पदक – सागर जाधव, यवतमाळ
६६ किलोखालील गट
सुवर्ण पदक – अजिंक्य मते, पिडीजेए
रौप्य पदक – कुणाल आव्हाड, नाशिक
कांस्य पदक – ध्रुव बुटोला, ठाणे
कांस्य पदक – प्रेम पवार, बीड
७३ किलोखालील गट
सुवर्ण पदक – पृथ्वीराज शेलार, क्रीडा प्रबोधिनी
रौप्य पदक – होरमजद जिजीना, मुंबई
कांस्य पदक – महेश कांबळे, सोलापूर
कांस्य पदक – शंभू चोपडे, छत्रपती संभाजीनगर
८१ किलोखालील गट
सुवर्ण पदक – स्वराज लाड, क्रीडा प्रबोधिनी
रौप्य पदक – विश्वेश सायकर, पिजेए
कांस्य पदक -राहुल बोंबडी, मुंबई
कांस्य पदक –ऋषिकेश पवार सोलापूर
९० किलोखालील गट
सुवर्ण पदक – ए एस बालाजी, पीडीजेए
रौप्य पदक – तुषार गडदे, क्रीडा प्रबोधिनी
कांस्य पदक – हितेन बुटोला ठाणे
कांस्य पदक – मयूर कोकरे, रायगड
१०० किलोखालील गट
सुवर्ण पदक – कबीर शेरेयार, मुंबई
रौप्य पदक – विकास देसाई, छत्रपती संभाजीनगर
कांस्य पदक -पृथ्वीराज जाधव, क्रीडा प्रबोधिनी
कांस्य पदक – सतिश शिंदे, अहिल्यानगर
१०० किलोवरील गट
सुवर्ण पदक – आदित्य परब पीडीजेए
रौप्य पदक – रमेश बहिरवाल, बीड
कांस्य पदक – आर्यन आगरकर, अहिल्यानगर
कांस्य पदक – मनवर्धन, पाटील ठाणे
बेस्ट रेफरी म्हणून सन्मानित – श्री प्रवीण पवार-सातारा; सौ पूर्वा लोकरे- ठाणे आणि श्री प्रशांत वाणी-धुळे

