सामाजिक उपक्रमातून सुनीलच्या कार्यातून प्रेरणा मिळेल / सामाजिक उपक्रमातून सुनील सारखे असंख्य कार्यकर्ते निर्माण व्हावेत : डॉ. मिलिंद कुलकर्णीतळेरे येथील रक्तदान शिबिरात 34 रक्तदात्यांचे रक्तदान*

सामाजिक उपक्रमातून सुनीलच्या कार्यातून प्रेरणा मिळेल / सामाजिक उपक्रमातून सुनील सारखे असंख्य कार्यकर्ते निर्माण व्हावेत : डॉ. मिलिंद कुलकर्णीतळेरे येथील रक्तदान शिबिरात 34 रक्तदात्यांचे रक्तदान*

*कोंकण एक्सप्रेस*

*सामाजिक उपक्रमातून सुनीलच्या कार्यातून प्रेरणा मिळेल / सामाजिक उपक्रमातून सुनील सारखे असंख्य कार्यकर्ते निर्माण व्हावेत : डॉ. मिलिंद कुलकर्णीतळेरे येथील रक्तदान शिबिरात 34 रक्तदात्यांचे रक्तदान*

*कासाडे प्रतीनीधी : संजय भोसले*

सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टकडून विविध सामाजिक उपक्रम सुरू असून त्यातून प्रेरणा घेऊन सुनीलसारखे असंख्य कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत. आजच्या या रक्तदानासारखे पुण्यदान नाही. तळेरे गावाला चांगला इतिहास आहे आणि चांगल्या माणसांची देण आहे, हे सर्व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले. यावेळी 34 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

ते तळेरे येथील सुनील तळेकर यांच्या 28 व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विभाग प्रचारक अमितजी पाल, जिल्हा संघ चालक अरविंद कुडतरकर, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, माजी सभापती दिलीप तळेकर, सुनील तळेकर वाचनालयाचे अध्यक्ष नारायण वळंजू, उपाध्यक्ष शशांक तळेकर, जिल्हा रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती ठोंबरे, राजू जठार, अशोक तळेकर, प्रा. हेमंत महाडिक, डॉ. अभिजीत कणसे आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे आयोजन स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट, स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालय आणि विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी आदर्श महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. दरवर्षी या ट्रस्ट कडून वर्षातून दोनवेळा रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.

शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्य विधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्याकडून रुग्णांना आर्थिक सहाय्य मिळते. मात्र, योग्य माहिती नसल्याने रुग्णांना मदत कशी मिळवायची असा प्रश्न निर्माण होतो. याबाबत सविस्तर माहिती आणि माहिती पत्रकाराचे वाटप मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे समाजसेवा अधीक्षक सुनील कुंडगीर यांनी केले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग प्रचारक अमितजी पाल यांनीही रक्तदान केले.

यावेळी जिल्हा रक्तपेढीचे समाजसेवा अधीक्षक नितीन तुरणर, रक्तपेढी तंत्रज्ञ मयुरी शिंदे, रक्तपेढी सहाय्यक ऋतुजा हरमलकर, परिचालक नितेश पाटील, विजय तिरुखेकर, वाहनचालक गणेश मांजरेकर यांच्यासह वाचनालयाचे सचिव मिनेश तळेकर, प्रवीण वरुणकर, दिनेश मुद्रस, शैलेश सुर्वे, मोहन भोगले, निकेत पावसकर, ग्रंथपाल साक्षी तळेकर, मदतनीस नेत्रा पावसकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल तळेकर तर आभार मिनेश तळेकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!