सावंतवाडीच्या विकासाला गती देण्यासाठी भाजप उमेदवारांना निवडून द्या…

सावंतवाडीच्या विकासाला गती देण्यासाठी भाजप उमेदवारांना निवडून द्या…

*कोंकण एक्सप्रेस*

*प्रभाग २ मध्ये बबन साळगावकर, सुनीता पेडणेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ…*

*सावंतवाडीच्या विकासाला गती देण्यासाठी भाजप उमेदवारांना निवडून द्या : विशाल परब*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मधील भाजपचे उमेदवार बबन साळगावकर आणि सुनीता पेडणेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज भाजप युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी श्री. परब म्हणाले, देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे विकासकामांना प्रचंड वेग आला आहे. या भक्कम नेतृत्वाच्या बळावर आपले दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना तुमचा प्रेमाचा आशीर्वाद लाभावा. त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!