*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता 1 तर नगरसेवक पदाकरिता 13 उमेदवारांची माघार*
*कणकवली ः संजना हळदिवे*
कणकवली नगरपंचायत निवडणुकी करिता दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांमधील आज नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदाकरिता तेरा उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. यामध्ये नगराध्यक्ष पदाकरिता सौरभ संदेश पारकर यांनी तर नगरसेवक पदाकरिता प्रभाग 1. राजेश राणे, प्रभाग 2. रोहिणी पिळणकर, प्रभाग 3. शिवम राणे, प्रभाग 4. श्रेया पारकर, प्रभाग 7. सोनाली कसालकर, प्रभाग 8. किशोर कांबळे, विठ्ठल कासले, प्रभाग 12. साक्षी नेरकर, प्रभाग 15. सुप्रिया नाईक, प्राजक्त आळवे, प्रभाग 16 हिरेन कामतेकर, सोहम वाळके, प्रभाग 17 मयुरी नाईक यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतले अशी माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी दिली.

