*कोंकण एक्स्प्रेस*
*नांदगावच्या मोरये भगिनी गाजवतायत क्रीडा आणि कला क्षेत्र : स्मृतीचा अभिनय, विधीचा खेळ संस्मरणीय*
*कणकवली प्रतिनिधी*
कुटुंबात कोणतेही क्रीडा किंवा कला क्षेत्राची पार्श्वभूमी नसताना केवळ आवड म्हणून आम्ही या क्षेत्रात आलो आणि एक चांगला प्रवास करत आहोत. यासाठी आम्हाला तशी समर्थ साथ आमचे आई बाबा, प्रशिक्षक आणि प्रायोजक यांनी दिली, असे प्रतिपादन मूळच्या नांदगाव वाशिनवाडी येथील असलेल्या आणि सध्या मुंबई येथे अभिनय क्षेत्रात प्रवास करणारी स्मृती आणि लॉन टेनिस खेळात यशस्वी ठरत असलेली विधी मोरये यांनी केले. या दोन्हीही भगिनी गावी आल्या असताना बोलत होत्या.
मुंबई सारख्या ठिकाणी कोणतीही पार्श्वभूमी नसताना केलेली दमदार वाटचाल कौतुकास्पद आहे. या प्रवासाबाबत बोलताना स्मृती म्हणाली की, उकळी या एकांकिकेने चांगली ओळख दिली. तसे मी अपघाताने अभिनय क्षेत्रात आली असली तरीदेखील कामातील सातत्य आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर अनेक ठिकाणी अभिनयाची चुणूक दाखवता आली. आवड म्हणून एक प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र अभिनय क्षेत्रात संधी मिळत गेली. महाराष्ट्रातील मानाच्या अनेक एकांकिका स्पर्धेत अव्वल ठरलेल्या उकळी या एकांकिकेने मानाच्या सवाई एकांकिका स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळविला. तर अभिनयाचे उत्कृष्ट पारितोषिक स्मृती मोरये यांना मिळाले. स्मृती मोरये यांच्या उत्तम अभिनयाबद्दल “पारंगत अभिनेत्री” हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
स्मृतीची कला कारकीर्द
नांदगावच्या मोरये भगिनी गाजवतायत क्रीडा आणि कला क्षेत्र : स्मृतीचा अभिनय, विधीचा खेळ संस्मरणीय
निकेत पावसकर
तळेरे : लोकमत न्यूज नेटवर्क
कुटुंबात कोणतेही क्रीडा किंवा कला क्षेत्राची पार्श्वभूमी नसताना केवळ आवड म्हणून आम्ही या क्षेत्रात आलो आणि एक चांगला प्रवास करत आहोत. यासाठी आम्हाला तशी समर्थ साथ आमचे आई बाबा, प्रशिक्षक आणि प्रायोजक यांनी दिली, असे प्रतिपादन मूळच्या नांदगाव वाशिनवाडी येथील असलेल्या आणि सध्या मुंबई येथे अभिनय क्षेत्रात प्रवास करणारी स्मृती आणि लॉन टेनिस खेळात यशस्वी ठरत असलेली विधी मोरये यांनी केले. या दोन्हीही भगिनी गावी आल्या असताना बोलत होत्या.
मुंबई सारख्या ठिकाणी कोणतीही पार्श्वभूमी नसताना केलेली दमदार वाटचाल कौतुकास्पद आहे. या प्रवासाबाबत बोलताना स्मृती म्हणाली की, उकळी या एकांकिकेने चांगली ओळख दिली. तसे मी अपघाताने अभिनय क्षेत्रात आली असली तरीदेखील कामातील सातत्य आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर अनेक ठिकाणी अभिनयाची चुणूक दाखवता आली. आवड म्हणून एक प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र अभिनय क्षेत्रात संधी मिळत गेली. महाराष्ट्रातील मानाच्या अनेक एकांकिका स्पर्धेत अव्वल ठरलेल्या उकळी या एकांकिकेने मानाच्या सवाई एकांकिका स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळविला. तर अभिनयाचे उत्कृष्ट पारितोषिक स्मृती मोरये यांना मिळाले. स्मृती मोरये यांच्या उत्तम अभिनयाबद्दल “पारंगत अभिनेत्री” हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
स्मृतीची कला कारकीर्द
स्मृती मोरये हिने उकळी (एकांकिका), समर सेश है, लत (लघुपट) अशा विविध माध्यमातून स्मृतींची अभिनय कारकीर्द दमदार सुरू आहे. तिच्या अभिनयाचे परेश रावल, विजय केंकरे, सिद्धार्थ जाधव, सुकन्या मोने अशा अनेक दिग्गज कलाकारांनी कौतुक केले आहे.
स्मृती सध्या रंगसंगती कलामंच च्या माध्यमातून कार्यरत असून भविष्यात तिच्या विविध कलाकृती पाहायला मिळणार आहेत. स्मृतीची बहिण विधी ही श्रीमंत लोकांचा खेळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लॉन टेनिस खेळात आपले उत्कृष्ट खेळीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेली 5 वर्षे ती हा खेळ अत्यंत मेहनतीने आणि चिकाटीने खेळत असून मोठ्या प्रयत्नांनी तिने अनेकदा यश खेचून आणले आहे.
याबाबत विधी म्हणते की, एखाद्या गोष्टीत तुम्हाला आवड किती आहे? तुमचे सातत्य कसे आहे? आणि तुमची मेहनत कितपत आहे? यावर तुमच्या त्या क्षेत्रातील यश, वाटचाल ठरत असते. त्यातही मुंबईसारख्या ठिकाणी लॉन टेनिस या परदेशी खेळात आपले सातत्य राखण्यासाठी जबरदस्त मेहनत घ्यावी लागते.
मुंबई येथे झालेल्या विभागीय राज्यस्तरीय स्पर्धेत विधीने उपविजेतेपद पटकाविले. गेली ५ वर्षे विधी हा खेळ खेळत आहे. एवढ्या अल्प कालावधीत तिने अनेक ठिकाणच्या स्पर्धांमध्ये आपले वर्चस्व राखले आहे. सध्या ती दादर येथील शिवाजी पार्क जिमखाना येथे सरावासाठी जाते.
आंतरराष्ट्रीय आणि खर्चिक खेळ
लॉन टेनिस हा खेळ आंतरराष्ट्रीय खेळ असून तो सामान्य कुटुंबातील मुलांना आणि पालकांना आर्थिकदृष्ट्या पेलवत नाही. शिवाय शहराशिवाय त्याला कुठेही सराव करता येण्यासारखा नाही. तरीही विधी आपल्याकडील या खेळात कोणीही नसूनही विधीने कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने या खेळात आपले उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे.
भरपूर व्यायाम
टेनिसच्या या खेळास चापल्य लागते. मागे, पुढे व बाजूला पळून, वाकून किवा उडी मारूनही चेडू टोलवावा लागतो. त्यामुळे शरीरास भरपूर व्यायाम होतो. यासाठी ती दररोज धावणे, स्किपिग, वॉर्मअप नियमित करते. त्यामुळेच ती या खेळात आपले वर्चस्व गाजवत आहे.
डी. जी. रुपारेल महाविद्यालयात ती बारावीला शिकत असताना खेळ आणि अभ्यास या दोन्हींकडे तेवढ्याच गांभीर्याने लक्ष दिले. त्यासाठी तिला अनुजा महेश्वरी ह्या प्रशिक्षक असून जोगेश्वरीमधून पहाटे निघून सकाळी ६ वाजता दादरच्या शिवाजी पार्कला विधी जाते.
दररोजचा अभ्यास, खेळाचा सराव, महाविद्यालय आणि फिटनेस या सर्व गोष्ठी ती लीलया पेलवते. त्यासाठी तिचे आईवडील, प्रशिक्षक यांचे मोलाचे सहकार्य मिळते.