*कोंकण एक्सप्रेस*
*भाजपा उमेदवार समीर नलावडे यांच्या अर्जावर शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी घेतली हरकत*
*कणकवली ः संजना हळदिवे*
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत सादर झालेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया आज सुरू असताना सर्वप्रथम नगराध्यक्ष पदाच्या अर्जाची छाननी करण्यात आली यात शहर आघाडी तथा क्रांतिकारी विचार पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या अर्जावर आक्षेप घेतला.नलावडे यांना एका गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली असल्यामुळे ते निवडणूक लढविण्यास अपात्र असल्याचे पारकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्या निदर्शनास आणले.

