‘ऑपरेशन सिदूर‘ दिपोत्सवातून भारतीय जवानांना सलाम

‘ऑपरेशन सिदूर‘ दिपोत्सवातून भारतीय जवानांना सलाम

*कोंकण एक्सप्रेस* 

*‘ऑपरेशन सिदूर‘ दिपोत्सवातून भारतीय जवानांना सलाम*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
      वेंगुर्ला शहरातील प्रसिद्ध मारूती स्टॉप नजिकच्या मारूती मंदिरात दिपावली निमित्त ‘ऑपरेशन सिदूर‘ नावाचा अनोखा दिपोत्सव साकारून भारतीय जवानांना सलाम केला.
येथील हनुमान मंदिर सेवा न्यासातर्फे दिपावली निमित्त दरवर्षी १ हजार १११ पणत्या प्रज्वलित करून दिपोत्सव साजरा करण्यात येतो. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पैलगाममध्ये पर्यटकांवर पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी हमला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतातर्फे ऑपरेशन ‘सिदूर‘ ही मोहिम हाती घेऊन अतिरेक्यांना सळो की पळो सोडले. भारतीय जवानांच्या यशस्वी आणि उल्लेखनीय देशसेवेची दखल घेऊन हनुमान मंदिर न्यासातर्फे २२ रोजी
भारत देशाचा नकाशा आणि ऑपरेशन सिदूर नावाचा दिपोत्सव साकारण्यात आला. या उपक्रमात बहुसंख्य नागरिकांनी सहभागी होत दिपोत्सवाचा आनंद लुटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!