*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या उपाध्यक्षपदी श्री. महेंद्र महादेव पावसकर यांची निवड*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित, सिंधुदुर्ग नगरीच्या अलीकडील संचालक मंडळाच्या बैठकीत श्री. महेंद्र महादेव पावसकर यांची एकमताने उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल शिक्षकवर्ग, पतपेढीचे सदस्य तसेच सहकारी क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पावसकर गुरुजी हे पी.एम.श्री आदर्श प्रा.शाळा तळेरे नं.१ येथे कार्यरत आहेत. तसेच पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून देखील उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडत आहेत.निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. महेंद्र महादेव पावसकर म्हणाले, “पतपेढीचा सर्वांगीण विकास, सदस्यांच्या हिताचे रक्षण आणि पारदर्शक कारभार हे माझे प्राधान्य असेल. नव्या योजना राबवून पतपेढीचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करू.”
या प्रसंगी पतपेढीचे अध्यक्ष श्री. चंद्रसेन पाताडे , जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधीक्षक श्री. श्रीकृष्ण मयेकर,संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते. निवडीचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
या निवडीमुळे पतपेढीच्या कार्यात नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला आहे.

