*कोंकण एक्सप्रेस*
*सिधुदुर्गनगरी २९ अनुसूचित जातीच्या यादीतील नोंद क्रमांक ३६ मधील धनगड या नावाऐवजी धनगर असे बदल शासन आदेश काढावे अशी मागणी धनगर समाज यांच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली*
सिधुदुर्गनगरी २९ अनुसूचित जातीच्या यादीतील नोंद क्रमांक ३६ मधील धनगड या नावाऐवजी धनगर असे बदल शासन आदेश काढावे अशी मागणी धनगर समाज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांसमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहेतयाबाबत शासनाने दखल न घेतल्यास केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही दिला आहे
.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाज संघटनेच्या वतीने अनुसूचित जमातीच्या यादीतील नोंद क्रमांक ३६ मधील धनगड ऐवजी धनगरशासन आदेश काढावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन दिले यावेळी संघटनेचे बापू पांडुरंग खरात सुरेश झोरे दीपा ताटे अमोल जंगले संतोष साळस्कर मंदार वरख विलास जंगले राजा बुटे आदींसह समाज बांधव उपस्थित होते
यावेळी दिलेल्या निवेदनात धनगर आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी धनगर अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा शासन ना आदेश काढावा म्हणूनजालना येथे उपोषण करते दीपक बोऱ्हाडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाचा एक भाग आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी धनगर जमातीची ही मागणी मान्य करण्यात यावी राज्यात धनगड नावाची कोणतीही जात जमात अस्तित्वात नाही जे आहेत ते धनगर आहेत मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिके मध्येकेंद्र व राज्य सरकार या प्रकरणात राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र मान्य केले आहे राज्यात धनगड नावाचा एकही व्यक्ती आजवर आढळून आलेला नाही आरक्षणाच्या यादीत अस्तित्वात नसलेल्या जात जमात समाविष्ट करू शकत नाहीत सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानात घटनापीठाने दिलेल्या मुनचीनप्पा यानिकाल नुसारआरक्षण यादीत समाविष्ट असलेली पण प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेली जात जमात संविधानाच्या कलम ३४२ कंसात एक अंतर्गत येते त्यामुळे हा मुद्दा संसदेसमोर नेण्याची गरज नाही तसेच राज्य शासनाच्या राज्यपालांच्या परवानगीने शासन आदेश जारी करण्याचा पूर्ण अधिकार आहे याचेच उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या महसूल व वन विभागाकडून १० ऑक्टोंबर २४ रोजी धनगर या शब्दाऐवजी धनगड असे वाचावे असा शासन निर्णय जारी केला होता यावरून स्पष्ट होते की राज्य सरकारला असा शासन आदेश काढण्याचा अधिकार आहे त्यामुळे अनुसूचित जमातीच्या यादीतील नोंद क्रमांक ३६ मधील धनगड या नावाऐवजी धनगर असे वाचावे असा शासन आदेश तात्काळकाढावा अशी मागणी आहे अन्यथा शासनाने काढलेल्या आदेशाविरुद्ध राज्यआणि केंद्र शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर केले आहे सोबत फोटो
सिंधुदुर्ग नगरी येथे सिंधुदुर्ग जिल्हा धनगर समाज संघटनेच्या वतीने बापू पांडुरंग खरात यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यामार्फत शासनाला निवेदन दिले यावेळी उपस्थित पदाधिकारी

