मातोश्री मंडळातर्फे नवरात्रौत्सवानिमित्त कार्यक्रम

मातोश्री मंडळातर्फे नवरात्रौत्सवानिमित्त कार्यक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*मातोश्री मंडळातर्फे नवरात्रौत्सवानिमित्त कार्यक्रम*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

*वाचा सविस्तर बातमी👇*

वेंगुर्ला येथील मातोश्री कला-क्रीडा मंडळाच्यावतीने २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दाभोली नाका येथे सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे आयोजन केले आहे.

दि.२२ रोजी सकाळी दुर्गामाता पूजन, महाआरती, तीर्थप्रसाद,  रात्रौ ७.३० वा. दांडिया नृत्य, रात्रौ ८ वा. रामेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा ‘भूवनेश्वरी महिमा‘ नाट्यप्रयोग,  दि. २३ रोजी रात्रौ ७.३० वा. दांडिया नृत्य, रात्रौ ८ वा. मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘दक्ष पुनर्जन्म‘ नाट्यप्रयोग, दि.२४ रोजी रात्रौ ७.३० वा. दांडिया नृत्य, रात्रौ ८ वा. ‘जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा‘ (लहान गट-१४ वर्षाखालील, खुला गट-१४ वर्षावरील), दि.२५ रोजी सायं. ४ वा. हिदू धर्माभिमानी चैत्र नवमी  महिला ग्रुपचे वा. ‘महालक्ष्मीष्टक स्तोत्र व अन्नपूर्णा स्तोत्र‘ पठण व भजन, रात्रौ ७.३० वा. ब्राह्मण देव महिला मंडळ देवगड यांचे समईनृत्य, दि. २६ रोजी रात्रौ ७.३० वा. दांडिया नृत्य, रात्रौ ८.३० वा. ‘फॅन्सीड्रेस स्पर्धा‘ (वयोगट ५ ते ८ वर्षे) आणि (वयोगट ९ ते १२ वर्षे), रात्रौ ९ वा. देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, दि. २७ रोजी रात्रौ ७.३० वा. दांडिया नृत्य, रात्रौ ८.३० वा. जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा (लहान गट – १४ वर्षाखालील, खुला गट – १४ वर्षावरील),   दि.२८ रोजी दुपारी ३ वा. खुली महिला वारकरी भजन स्पर्धा, रात्रौ ८.३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम, दि.२९ रोजी रात्रौ ७.३० वा. दांडिया नृत्य, रात्रौ ८ वा. खेळ पैठणीचा, दि.३० रोजी रात्रौ ७.३० वा. दांडिया नृत्य, रात्रौ ८ वा. ग्रामोन्नत्ती मंडळ आचरा-पिरवाडी येथील राधाकृष्ण कलामंच मुंबई यांचे ‘वाट चुकलो देव‘ हे दोन अंकी मालवणी नाटक, दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी श्री सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद, रात्रौ ७.३० वा. दांडिया नृत्य, रात्रौ ८ .३० वा. के.चंद्रा प्रस्तुत ऑर्केस्ट्रा मेलडी मेकर्स हा मराठी व हिदी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम,  दि.२ रोजी सायं. ४ वा. महाआरती, सायं. ५ वा. दाभोली नाका-पिराचा दर्गा-श्रीराम मंदिर मार्ग-गाडीअड्डा नाका-बाजारपेठ – जुने बस स्थानक ते मांडवी येथे सवाद्य विसर्जन मिरवणूकीने श्री दुर्गामातेचे विसर्जन होणार आहे.
नवरात्रौत्सव दरम्यान दररोज स. ९ वा. श्री देवी दुर्गा माता नित्य पूजन, दुपारी १२.०० वा. नित्य नैवेद्य, सायं. ६.३० वा. भजन व महाआरती होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मातोश्री कला-क्रीडा-मंडळ आणि नवरात्रौत्सव समितीतर्फे अध्यक्ष विलास गावडे व उपाध्यक्ष प्रणव वायंगणकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!