युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षकांसाठी AI च्या मदतीने स्पर्धा परीक्षांकरिता प्रश्न निर्मिर्ती कार्यशाळेचे आयोजन

युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षकांसाठी AI च्या मदतीने स्पर्धा परीक्षांकरिता प्रश्न निर्मिर्ती कार्यशाळेचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षकांसाठी AI च्या मदतीने स्पर्धा परीक्षांकरिता प्रश्न निर्मिर्ती कार्यशाळेचे आयोजन*

*कणकवली- प्रतिनिधी*

मा पालकमंत्री श्री नितेशजी राणे साहेब यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे AI प्रशिक्षण पूर्ण झाले असून AI चा दैनंदिन शैक्षणिक प्रक्रीयेत वापर वाढावा यासाठी पालकमंत्री आग्रही आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी या उद्देशाने युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी ज्ञान रचनावाद व डीजीटल शाळा या विषयावर युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने यशस्वी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यावर्षी युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने उपक्रमशील शिक्षकांसाठी गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी, 10 ते 5 या वेळेत भालचंद्र महाराज सभागृह, पंचायत समिती कणकवली येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रश्न निर्मिर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात A I च्या साह्याने इयत्ता १ ली ते ७ वी मधील स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक प्रश्नावली तयार करण्यात येणार असून ही प्रश्नावली सर्व शाळांसाठी PDF स्वरुप मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या कार्यशाळेत जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील तज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत तरी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि सौ संजना संदेश सावंत, माजी जि प अध्यक्ष यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी श्री सुशांत मर्गज सर (9420206326)आणि श्री प्रमोद पवार सर(9421266751) यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!