वेंगुर्ला सातेरी मंदिरात नवरात्रौत्सव

वेंगुर्ला सातेरी मंदिरात नवरात्रौत्सव

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ला सातेरी मंदिरात नवरात्रौत्सव* 

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
वेंगुर्ल्याची ग्रामदेवी श्री सातेरी मंदिरात २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांनी नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे.
दि.२२ रोजी सकाळी ९ वा. घटस्थापना आणि उत्सवाची सुरूवात, २२ ते ३० सप्टेंबरपर्यंत अभंग, भक्तिगीत गायन, संगीत व वारकरी भजने आणि आरती आदी कार्यक्रम, दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. नवचंडी होमहवन व पूर्णाहूती आणि उत्सवाची सांगता. तसेच उत्सव कालावधीत देवीच्या नऊ रूपांचे दर्शन, सजावट, पुष्पपूजा असे कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!