*कोंकण एक्स्प्रेस*
*कॅरम स्पर्धेत भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा आर्यन गवंडळकर प्रथम*
*मालवण : प्रतिनिधी*
मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आर्यन राजेंद्र गवंडळकर याने वराडकर हायस्कूल कट्टा, येथे पार पडलेल्या मालवण तालुकास्तरीय १९ वर्षाखालील क्रीडा स्पर्धेमध्ये कॅरम खेळात प्रथम क्रमांक पटकावत यश मिळविले.
आर्यन याने उत्कृष्ट एकाग्रता, संयम आणि कौशल्य दाखवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपद मिळवले. त्याच्या या यशामुळे त्याची पुढील जिल्हास्तरावर निवड झाली आहे. या यशाबद्दल आर्यन याचे संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर मानद सचिव साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, प्राचार्य एच बी तिवले व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.