*कोंकण एक्सप्रेस*
*आमदार दीपक केसरकर यांनी पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांची मुंबईत घेतली भेट*
*ताज ग्रुप हॉटेल प्रकल्प आणि प्रस्तावित सबमरीन प्रकल्पाबाबत सविस्तर केली चर्चा*
*मुंबई*
वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथील ताज ग्रुप हॉटेलचा प्रकल्प आणि निवती येथील सब मरीन (पाणबुडी) प्रकल्प लवकरात-लवकर मार्गी लावला जाईल, असे आश्वासन पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांनी दिले. दरम्यान या प्रकल्पांना चालना देण्यासाठी लवकरच एक विशेष बैठक आयोजित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आमदार दीपक केसरकर यांनी पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांची मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी ‘मेघदूत’ बंगल्यावर त्यांची भेट घेतली. यावेळी ताज ग्रुप हॉटेल प्रकल्प आणि प्रस्तावित सबमरीन प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. तसेच या सर्व प्रकल्पांना आवश्यक ती मदत करून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे ही ते म्हणाले.