*कोंकण एक्सप्रेस*
*आरोग्य विभागाच्या इमारतींचे लोकार्पण*
*सिंधुदुर्गनगरी दि 10 (जिमाका)*
राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा नियोजन मधुन बांधलेल्या 6 नुतन इमारतींचा लोकार्पण व 3 नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतींचे भुमिपूजन खासदार नारायण राणे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने पार पडले. हा समारंभ ओरोस येथील शरद कृषी भवन येथे संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधिखक सौरभ अग्रवाल, जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते.