*कोंकण एक्सप्रेस*
*चर्मकार समाज मंडळाच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन…*
* कणकवली : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचा वर्धापन दिन व संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंडळाच्यावतीने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन, खुला अशा गटांमध्ये होणार आहे.
शालेय गट-ड. ५ ते १० वीसाठी संत रविदास महाराज यांचा जीवनपट हा विषय असून शब्द मयार्दा ५०० आहे. महाविद्यालयीन गट-युवा गट- ११ ते १५ वीसाठी संत रविदास महाराज यांचे सामाजिक कार्य हा विषय असून शब्द मर्यादा १००० आहे. खुला गटासाठी संत रविदास महाराज यांचे समतावादी व वैज्ञानिक विचार हा विषय असून शब्द मयार्दा १५०० आहे. स्पर्धकांनी निबंध लेखन स्वहस्ताक्षरात किंवा टंकलिखित करून त्याची पीडीए बनवून १० मार्चपर्यंत चंद्रसेन पाताडे यांच्याकडे पाठवावेत, असे आवाहन मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी केले आहे.