हातकणंगलेत आगीत पत्रावळी बनवणारा कारखाना बेचिराख! ४० कोटींचे नुकसान..

हातकणंगलेत आगीत पत्रावळी बनवणारा कारखाना बेचिराख! ४० कोटींचे नुकसान..

कोंकण एक्सप्रेस 

हातकणंगलेत आगीत पत्रावळी बनवणारा कारखाना बेचिराख! ४० कोटींचे नुकसान..

कोल्हापूर

हातकणंगलेजवळील एका पत्रावळ्या तयार करणाऱ्या कारखान्यास मोठी आग लागली. त्यात संपूर्ण कारखाना बेचिराख झाला. अग्निशामक दलाच्या सात बंबानी आग आटोक्यात आणली. या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. आळते – रामलिंग पत्रावळ्यासह इको फ्रेंडली वस्तू बनवणारा ग्रिनवेल इको फ्रेडली ॲग्रो प्रॉडक्ट नावाचा कारखाना आहे. येथे २५० कर्मचारी काम करतात. सकाळी ११ वा. कारखान्याचा बॉयलर भडकल्याचे कर्मचाऱ्यांना दिसले.*

आगीने बॉयलर भडकताच शिल्लक जळण, शेजारील तयार मालाला आग लागली. आग इतकी झपाट्याने पसरली की कामगारांना बाहेर पडणे मुश्किल झाले होते. आगीत संपूर्ण तयार माल, कच्चा माल, यंत्रसामग्री, कारखाना भस्मसात झाला.

इचलकरंजी महानगरपालिका, पंचगंगा, शरद साखर कारखाना, जयसिंगपूर नगरपालिका, घोडावत उद्योग, हातकणंगले नगरपंचायत, पेठवडगांव नगर परिषदेच्या अग्निशामक बंबानी आग आटोक्यात आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!