*कोकण Express*
*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 15 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सोलर लाईटचे लोकार्पण*
*सिंधुदुर्ग*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 15 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच मनसे नेते श्री. शिरीष सावंत, सरचिटणीस श्री. जिजी उपरकर, चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर, सरचिटणीस शशांक नागवेकर, कोषाध्यक्ष चंद्रकांत वंदे प्रसाद गावडे कुडाळ तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या सौजन्याने दोन सोलर लाईट एक अण।व गावी तसेच एक श्री देव कलेश्वर स्थानिक देवस्थान समिती नेरूर, तसेच मनसे चित्रपट सेनेतर्फे मास्कचे वाटप करण्यात आले.
या वेळी देवस्थान समिती नेरूरचेअध्यक्ष प्रदीप नाईक, खजिदर गावडे, गुरू गावडे, अवधूत प्रभू, तातू देसाई आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या साठी प्रवीण नेरूरकर यांनी विषेश प्रयत्न केले.
सर्व नेरूर वासीयांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 15 व्या वर्धापन दिनी तसेच येणाऱ्या महाशिवरात्री निमित्त शुभेच्छा!