*कोकण Express*
*कणकवली पत्रकार समिती अध्यक्षपदी चंद्रशेखर देसाई बिनविरोध तर सचिवपदी संजय राणे यांची निवड….!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुका पत्रकार समितीच्या नूतन कार्यकारिणी निवडीसाठीची सभा येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे मंगळवारी पार पडली. सभेत तरुण भारतचे कणकवली तालुकाप्रमुख चंद्रशेखर देसाई यांची तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत सचिव संजय राणे, खजिनदार नितीन कदम, उपाध्यक्ष उत्तम सावंत व विशाल रेवडेकर, सहसचिव मिलिंद डोंगरे, कार्यकारिणी सदस्य रंजीता तहसीलदार, विनोद जाधव, गुरुदास सावंत, रमेश जामसंडेकर, तुळशीदास कुडतरकर यांची निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक म्हणून उज्ज्वल नारकर व एकनाथ पवार यांनी काम पाहिले.
याप्रसंगी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, ज्येष्ठ पत्रकार माधवराव कदम, संतोष वायंगणकर, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत भावे, मावळते तालुकाध्यक्ष भगवान लोके, सचिव नितिन सावंत, सुधीर राणे, माजी तालुकाध्यक्ष अजित सावंत, संतोष राऊळ आदींसह तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर पत्रकार समितीतर्फे नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला.