*कोकण Express*
*वैभववाडी तालुक्यातील नर्ले ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन….*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.श्री.विनायक राऊत साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने व तत्कालीन पालकमंत्री श्री.दिपकभाई केसरकर* यांनी नर्ले ग्रामपंचायत इमारतीसाठी जनसुविधा योजनेअंतर्गत *१२ लाख* रुपये निधी उपलब्ध करून दिला. या कामासाठी विशेष पाठपुरावा या गावचे विदयमान *सरपंच डॉ. आर .बी.जाधव* यांनी केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम लवकर मार्गी लागले आहे . असे कोकण सिंचन मंडळाचे *माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री. संदेश पारकर* यांनी आज नर्ले येथे ग्राम सचिवालय भूमिपूजन प्रसंगी बोलताना असे मत व्यक्त केले. यापुढे सुद्धा खासदार व पालकमंत्री यांच्या माध्यमातून नर्ले गावासाठी व या भागातील कामांसाठी विशेष विकासनिधी दिला जाईल असे सांगितले .या वेळी त्यांच्या सोबत उपजिल्हा *प्रमुख- नंदू शिंदे, तालुका प्रमुख- मंगेश लोके,जिल्हाबँक संचालक- दिगंबर पाटील , संदेश पटेल, सरपंच- आर.बी.जाधव,उपतालुका प्रमुख- सुरेश पांचाळ,माजी सभापती- आप्पा खानविलकर,शाखा प्रमुख- यशवंत खानविलकर, उपसरपंच- मोहन हदशी, निलंबरी पांचाळ, निर्मला कांबळे, शोभना जाधव आधी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

