*कोंकण एक्सप्रेस*
*पेंडूर मांड उत्सवाला माजी आ.वैभव नाईक यांनी भेट देऊन घेतले दर्शन*
*मालवण :प्रतिनिधी*
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा पेंडूर येथील १४ दिवशीय त्रैवार्षिक मांड उत्सवास भेट देऊन श्री देव वेताळाचे दर्शन घेतले.
याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवराम सावंत पटेल,सचिव अमित कुलकर्णी,भाऊ पटेल,संतोष परब,रामू सावंत,मनोज राऊळ,रमेश सावंत ,निलेश हडकर,दर्शन म्हाडगुत, शेखर रेवडेकर,विनोद सावंत,किरण आकेरकर,नितीन राऊळ,संदीप सावंत,बिट्टू सावंत,प्रथमेश राणे,जयेद्रथ परब व अन्य पेंडूर ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी पेंडूर देवस्थान ट्रस्टच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह,देऊन सत्कार करण्यात आला.