*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न*
*कणकवली : प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत मराठी भाषा संवर्धन व विकास कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर यांनी मार्गदर्शन केले इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा संवर्धन करतांना कोणती काळजी घ्यावी,यासाठी मातृभाषेतील वैशिष्ट्ये पूर्ण वाङ्मय कोणते वाचावे अध्ययन करतांना श्रवण आकलन चिंतन आणि लेखन यांचा विकास करून मातृभाषेची आवड जोपासून संवर्धन करण्यास बाल वाचकांनी कसा हातभार लावावा या विषयी मार्गदर्शन केले तसेच चरित्र आत्मचरित्र यांच्या वाचनाने मराठी भाषा विकसित कशी होते या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
नगर वाचनालयातील ग्रंथा विषयी विद्यार्थांना परिचय करून देण्यात आला.ग्रंथालयाचा वाचन विकासात कसा उपयोग करून मराठी मातृभाषेचे संवर्धन व विकास विद्यार्थांनी आपल्या जीवनापासूनच सुरुवात करावी याचेही ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात आले.यावेळी प्रशालेतील अमराठी भाषिक विद्यार्थी उपस्थित होते ज्यांची मातृभाषा मराठी नाही असे परराज्यातील विद्यार्थी मराठी भाषेचे अध्ययन करत असतात त्यांच्यासाठी उत्तम मराठी ग्रंथांचा परिचय करून देण्यात आला त्यांना मराठी भाषेची अभिरुची वाढवून मराठीच्या विकासात अमराठी भाषिक कसा प्रयत्न करतात याचीही जाणीव जागृती करण्यात आली यावेळी विद्यामंदिर प्रशालेतील मराठी विभागाचे अध्यापक पर्यवेक्षक सौ वृषाली जाधव,सौ .नेहा सावंत श्री .संदिप कदम,सौ विद्या शिरसाठ,श्री दरवडा नगर वाचनालयाचेग्रंथपाल राजू ठाकूर सौ आचार्य मॅडम,श्री मुसळे व विद्यार्थी उपस्थित होते.